“गुरु- आराध्या” फाउंडेशन, नाशिकच्या वतीने “वात्सल्य वृद्धाश्रम”, पंचवटी नाशिक येथे दिवाळी निमित्ताने साडी,पुरुषांना ड्रेस तसेच दिवाळी फराळ, लाडू वाटप करण्यात आले.
फाऊंडेशनच्या वतीने अप्रतिम कार्यक्रम संपन्न झाला.
यांमध्ये सर्वप्रथम फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा- डॉ.सौ.अर्चनाताई आहेर.गणोरेकर यांनी आपले मनोगत मांडले, यांमध्ये वृद्ध महिला-पुरुष यांच्याशी सवांद साधला, भजन गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच जीवनाकडे सकारात्मक कसे बघावे व आता जे आहे यात कसे “समाधान मानून आनंदी जगावे” अशा आध्यात्मिक गोष्टीवर मार्गदर्शन केले, यानंतर संस्थेचे सचिव प्रा. ललित खैरणार यांनीही उपस्थित सर्वांना “जे झालं ते चांगलं झालं”. यांवर मार्गदर्शन केलं व गेम्स घेतं सर्वांना हसायला लावले…!
तसेच डॉ.अर्चनाताई यांनी संस्थेतील सर्व वृद्ध महिला-पुरुष यांना मनसोक्त हसायला लावले, व भजनाच्या तालावर सर्वानी मनसोक्त आनंद घेतला…! प्रमुख उपस्थिती व या कार्यक्रमासाठी खारिचा वाटा ज्यांनी उचलला अशे संस्थेचे सदस्य, गुरुप्रसाद आहेर, मयूरी शुक्ला, श्रद्धा गायकर, कल्पना दुशिंग, शुभांगी शेळके,सुमन शेळके,छाया कोठावळे,सुरेखा सांगळे, दिप्ती मोरे, मोनिका कमानकर ,साधना सावकार, मनिषा हासे ,मेघा वर्पे,सुरेखा मैंद,रचना चिंतावार,वर्षा दंडगव्हाळ,मंजुश्री रेवगडे,शैला भगतं,मंजू पाटील, मनिषा पगारे हे उपस्थित असून यांची मदत लाभली.
यानंतर,”महिलांना साडी वाटप व पुरुषांना कपडे वाटप करण्यात आले व नंतर सर्वाना दिवाळी निमित्ताने फराळ व लाडू वाटप करण्यात आले..!
सर्वांच्या चेहऱ्यावर या कार्यक्रमातुन आनंद फुलला आणि “वृध्दाश्रम” न म्हणता “आनंदाश्रम”असा उल्लेख झाला…!
सर्वांचे आशीर्वाद घेतले. तसेच या कार्यक्रमात संस्थचे प्रमुख श्री. सोनार साहेब,तेथील स्टाफ व मॅनेजर साहेबांचे आम्हांला सहकार्य लाभले.

