पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने समाज एकत्र येतोय,प्रथमच दिनदर्शिका प्रकाशित होतेय याचा आनंद आहे या दिनदर्शिकेमुळे संत नामदेव महाराज यांचे विचार घराघरात पोहोचतील,कोतुळ येथील संत नामदेव महाराज मंदीरासाठी 20 लाख रुपये व अकोले येथील मंदिरासाठी भरीव मदत करणार असल्याचे प्रतिपादन अकोले तालुक्याचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी केले.
ते कोतुळ येथे रमेशराव नेवासकर यांच्या सौभाग्य मंगल कार्यालय येथे आयोजित अहिल्यानगर जिल्हा संत नामदेव प्रतिष्ठाण च्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर जिल्हा संत नामदेव प्रतिष्ठान चे अध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली)लचके होते.
या वेळी व्यासपीठावर हभप नितीन महाराज गोडसे,हभप अरुण महाराज दिघे, कोतुळचे उपसरपंच संजय देशमुख,रमेश नाना नेवासकर,रमेश झांबरे,अरुण हेंद्रे, चंद्रकांत खर्डे, बाळासाहेब मुळे, कैलास खंदारे,केशवराव भगत, अशोक राव दिवे,अरविंद गुजर,डॉ.सुहास उरणकर,सौ.अपूर्वा उरणकर,नरेंद्र लचके, श्रीनिवास रेणूकदास,प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, हेमंत देशमुख,सागर नेवासकर,प्रशांत नेवासकर, हेमंत नेवासकर,युवराज हंगेकर,अभिजित अवसरकर,आदीसह अकोले, संगमनेर, श्रीरामपूर,राहुरी,कोपरगाव,पारनेर, जामखेड, नेवासा, शेवगाव, तालुक्यातील महिला व समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी आ.डॉ.लहामटे पुढे म्हणाले की,
तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून राजूर येथील राम मंदिराला सहकार्य केले व पुढेही करणार आहे.मंदिरे घडली,गड किल्ले उभे राहिले ही आठवण वर्षोनुवर्षे राहणार आहे.कोतुळ ला नामदेव महाराज मंदिरासाठी 20 लाख निधी देणार आहे. अकोलेच्या नामदेव मंदिराला भरीव मदत करणार आहे.राजा हरिश्चंद्र नगरीतील असुन मला शब्द पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद मिळावा, माझ्या हातून चांगले काम होत राहो, सर्वाना घेऊन बरोबर जायचे आहे,माणसाने माणसाशी मानसासारखे वागावे, असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे आ.डॉ.किरण लहामटे यांनी करताना सर्व उपस्थितांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आपली अशीच प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे व प्रतिष्ठान चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लचके (माऊली)यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देत प्रतिष्ठाणच्या वतीने संत नामदेव शिंपी समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.जिल्हाभर पडलेल्या संत नामदेव समाजाची एकजूट करायची आहे.त्यामुळे एकमेकांच्या ओळखी होणार आहेत.समाजातील मुलांसाठी शिक्षणासाठी निधी उभा करणार आहे.प्रतिष्ठानच्या वतीने समाजासाठी 5 कोटी चा निधी उभा करायचा असून आपण समाजसेवक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिष्ठान च्या वतीने समाजसंघटन करून हृदयात जागा करायची आहे.दिनदर्शिका तयार करण्यात सर्वात मोठे योगदान अकोले तालुक्याचे आहे असे नमूद केले.सर्वांनी समाजासाठी एकत्र यावे असे आवाहन श्री लचके यांनी यावेळी केले. यावेळी हभप नितीन महाराज गोडसे,हभप अरुण महाराज दिघे,हभप सुखदेव महाराज, राजेंद्र कटारे,अशोकराव दिवे,श्रीमती रजनी टिभे, केशवराव भगत,अरुण हेंद्रे, अरविंद गुजर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक कैलास खंदारे यांनी केले ,सूत्रसंचालन प्राचार्य विद्याचंद्र सातपुते व केशवराव मगर यांनी केले तर आभार बाळासाहेब मुळे यांनी मानले.शेवटी पसायदान होऊन स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
