पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- समाजासाठी काम केले तर समाजही आपला सन्मान करतो असे प्रतिपादन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आ.बाबाजीसेठ काळे यांचे भाचे अनुराग जैद यांनी केले.
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने उद्योजक माणिकराव डावरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुळी ( चाकण) येथे प्रोफाइव्ह इंजिनिअरिंग कंपनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी श्री जैद बोलत होते.
अक्षय ब्लड बँक, हडपसर (पुणे)यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिरामध्ये प्रोफाइव्ह इंजिनिअरिंग कंपनी च्या 142 अधिकारी, कामगार,कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते होते.
यावेळी कंपनीचे डायरेक्टर माणिकराव डावरे,दीपक तारगे,
अनुराग सेठ जैद – सभापती, खेड कृषी उत्पन्न समिती,
संतोष सेठ पवळे उद्योजक ,
नितीन सेठ कड उद्योजक ,
पंडित सेठ कड उद्योजक , नितीन म्हसे,उद्योजक,
प्रमोद सर आठले ( इंडस्ट्रियल कन्सलटन्ट)भारत पिंगळे, शांताराम वैद्य,जि.प.प्रा.
शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष रवींद्र वैद्य,सदस्य योगेश वैद्य,शिक्षक श्री.ढोले सर, इंदोरी विद्यालयाचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक शांताराम मालुंजकर,निंब्रळ विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी सहाणे, आय.टी.आय चे प्राचार्य अरुण भालेराव,निदेशक पी.बी.नवले, दौलत धुमाळ, कंपनी चे मॅनेजर तथा अधिकारी किरण थोरात,अजित डावरे,तुषार वाडेकर,विशाल मालुंजकर अण्णासाहेब डावरे,सुधीर डावरे,आकाश डावरे,आदीसह उपस्थित अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री अनुराग जैद पुढे म्हणाले की, अकोलेचे भूमिपुत्र माणिकराव डावरे यांनी खेड तालुक्यात इंडस्ट्री सुरू करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.त्याच बरोबर गावाशी आपली नाळ जोडून ठेवून,सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील शाळांना चांगली मदत करीत आहे.आपण समाजासाठी काही काम केले तर समाजही आपला सन्मान करतो हे आज अकोलेकरांनी चाकण येथे येऊन माणिकराव डावरे यांचा केलेला सत्कारावरून सिद्ध केले आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब अकोले सेंट्रल ने रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य असल्याचा सांगून वाढदिवसाच्या व कंपनी ची पुढेही उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी माणिकराव डावरे यांच्याशी आलेला संपर्क व पुढे वाढत गेलेला स्नेह संबंध याची माहिती देऊन उद्योजक डावरे यांनी तालुक्यातील विविध संस्था ना केलेल्या मदतीचा आढावा घेतला.तसेच वाढदिवस हा नुसता सत्काराने साजरा करण्यापेक्षा त्याचे औचित्य साधून काही सामाजिक उपक्रम राबविता येऊ शकतो का हा विचार पुढे आला आणि धकाधकीच्या जीवनात रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले आणि त्यास डावरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी इंडस्ट्रीयल कन्सल्टंट प्रमोद आठले, आय टी आय अकोले चे निदेशक पी.बी.नवले,जि.प.प्रा.शाळा,सुगाव खुर्द चे शिक्षक श्री.ढोले,मुख्याध्यापक शांताराम मालुंजकर,संभाजी सहाणे,डायरेक्टर दीपक तारगे आदींनी मनोगत व्यक्त केले व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना माणिकराव डावरे म्हणाले की, माझे शिक्षण 12 संस्थेमध्ये झाले, त्याची जाणीव ठेवून आपण जन्मभूमी असलेल्या अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे या साठी मदत करीत आहे.
माझा वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची संकल्पना रोटरी क्लब अकोले चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते सर यांनी सुरू केली.कंपनीच्या प्रगतीमध्ये सर्व अधिकारी,कामगार,कर्मचारी यांचा मोलाचे योगदान आहे.आपण आपले कार्यावर लक्ष केंद्रित करावे असे स्पष्ट केले.
सूत्रसंचालन पंकज कुंभारे यांनी केले तर आभार अजित डावरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण थोरात, तुषार वाडेकर, आकाश डावरे यांनी परिश्रम घेतले.

