पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
आदिवासी दुर्गम भागात नवीन पिढीसाठी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेकांना आयुष्यात उभे केले .त्यामुळे आजचा सोहळा हा कर्तृत्वाच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा आहे असे प्रतिपादन पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस झेड देशमुख यांनी संस्थेचे सचिव शांताराम काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुर या ठिकाणी प्रतिपादन केले. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस झेड देशमुख सर, योगी केशव बाबा चौधरी ,लिज्जत पापड उद्योग समूहाचे सुरेश कोते, श्रीनिवास वाणी, संस्थेचे विश्वस्त प्रकाश टाकळकर सर, संस्थेचे कोषाध्यक्ष संतोष बनसोडे, सचिन देशमुख ,संदीप कोरडे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजुरचे योगेश ढोणे , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संतोष साबळे, संदीप घुले, प्रकाश महाले, रामशेठ पन्हाळे, स्वप्निल काळे, अमोल वैद्य , मंजुषा काळे, भीमाशंकर नाडेकर ,विलास महाले ,दत्ता भोईर, विजय पोखरकर, सुरेश भांगरे, अनिल आरोटे, प्रा बाबासाहेब देशमुख ,कल्पना देशमुख, सीमा निकम ,उदय माळवे ,एस .टी येलमामे,मच्छिंद्र देशमुख हे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
एस .झेड देशमुख यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे दूध पिल्यानंतर वाघिणीसारखे डरकाळी फोडाल हे बाबासाहेबांनी व्यक्त केलेले विचार फार महत्त्वाचे आहेत. आज मोबाईलमुळे बोलणे कमी झाले. व्हाट्सअप वर येणाऱ्या खोट्या गोष्टी सांगितल्या त्या पटतात त्यामुळे समाज वेगळ्या मार्गाने जात आहे. यासाठी वाचन वाढविणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, शिवाजी महाराजांचे चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारत पाकिस्तान फाळणी हे पुस्तक घरात असणे गरजेचे आहे. या पुस्तकांमुळे समाजात नीतिमूल्य टिकू शकतात परंतु ही पुस्तके जर विद्यार्थ्यांप्रती पोहोचले नाहीत वाचन कमी झालं तर समाजात खूप मोठी दरी निर्माण होईल.
संत महात्म्यांनी, देशभक्तांनी, समाज सुधारकांनी ,आपल्याला खूप काही दिले परंतु त्याचा उपयोग आज आपण करत नाही. त्यांनी खूप महान कार्य केले .आपण त्यांच्याकडून काय घेतलं हे महत्त्वाच आहे आपण म्हणतो हा महाराष्ट्र शाहू ,फुले ,आंबेडकरांचा आहे परंतु त्यांचे विचार आज मागे पडत आहेत. समाजात गोंधळाची बजबुरी सुरू झाली आहे. आज दारूला पैसे दिले नाही तर आईला मारणारा मुलगा, बापाला मारणारा मुलगा निर्माण झाला .आजचे राज्यकर्ते खोऱ्याने पैसा ओढणारे आहेत याचे वाईट वाटते. कृष्णाची ,रामाची मंदिरे बांधली पण त्यांचे गुण आदर्श आपण घेतले नाही. आम्ही आज राम ,ज्ञानेश्वर तुकाराम, श्रीकृष्ण ,सद्गुरूंना विसरलो याचे वाईट वाटते. किती मार्क मिळवले याला महत्व नाही तर समाजाचा आपण काय देणं लागतो हे महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर ,राम, शिवाजी महाराज ,लोकमान्य, सावरकर निर्माण झाले हे महत्त्वाचे आहे या सर्वांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये खोलवर रुजवणे गरजेचे आहे .
त्याचबरोबर लिज्जत पापड उद्योग समूहाचे सुरेश कोते यांनी आज बापूंना 60 वर्षे पूर्ण होऊन 61 व्या वर्षात पदार्पण केले. प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे स्रीचा हात मोठा असतो. शैक्षणिक क्षेत्रात वैभव प्राप्त झालं समाजात कर्तुत्वाचा सन्मान निर्माण केला. बापू नाव सर्वोच्च नाव आहे . त्यांचे व्यक्तिमत्व प्रत्येकाशी नम्रतेने वागणे, समोरच्याचे गुण ओळखणे हे बापूंमध्ये आहे. ज्या झाडाला पानफळ फुले आहे ते झाड वाकते, त्याप्रमाणे बापू आहेत. अशोका सारखे झाडाकडून काही मिळत नाही बापू हे आगळवेगळे व्यक्तिमत्व आहे प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये आहे .हा प्रामाणिकपणाच जीवन समाजाला आदर्शवत बनवतं हे महत्त्वाचं आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समता फाउंडेशन आयोजित रोटरी क्लब अकोले यांच्या वतीने नेत्र निदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये 110 रुग्णांनी तपासणी करून घेतली व त्यापैकी 15 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी पाठविण्यात आले. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे “शिक्षणाचा नवा मार्ग, मिशन प्रवेश “व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच दहावी बारावी प्रथम आलेल्या गुणवंतांचाही सत्कार करण्यात आला.
शेवटी संस्थेचे सचिव शांताराम काळे (बापू )यांनी निस्वार्थपणाने काम केल्यास सर्वजण खंबीरपणे मागे उभे राहतात. तुमच्या सर्वांमुळे मला ऊर्जा मिळते. ती संधी मला उपलब्ध करून आपण सर्वांनी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य किरण भागवत यांनी केले. तर सूत्रसंचालन विनायक साळवे व सारिका काळे यांनी केले .
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


