पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- सन २०२४-२५ या वर्षात रोटरी क्लब अकोले सेंट्रल शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य,पर्यावरण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल १३ जिल्हे असलेल्या ११० रोटरी क्लब मधून
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने
स्टार रोटरीयन ऑफ द इयर,
बेस्ट हॅपी स्कुल इन डिस्ट्रिक्ट प्लॅटिनियम अवॉर्ड,मॅक्सिमम ट्री प्लॅनीटेशन गोल्डन अवॉर्ड
,बेस्ट डिस्ट्रिक्ट इन्फासीस प्रोजेक्ट अंतर्गतAvoidable Blindness चा गोल्डन अवॉर्ड,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन सर्टिफिकेट अशा
५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशी माहिती रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.
रविवार दि.३ ऑगस्ट रोजी जालना येथे झालेल्या आनंदोत्सव या पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे मोहन पालेशा,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.सुरेश साबू,सौ.निर्मला साबू,सुधीर लातुरे
सौ. संगीता लातुरे
जयेश पटेल,
सौ.पारुल पटेल
क्षितिज झावरे,
सौ.मधुरा झावरे
असिस्टंट गव्हर्नर विनोद पाटणी,असिस्टंट गव्हर्नर
अमोल वैद्य
पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख
उपाध्यक्ष किरण गजे हे उपस्थित होते.
रोटरी क्लब अकोले सेंट्रल या संस्थेने सन २०२४-२५ मध्ये अनेक उपक्रम राबविले. त्या मध्ये भोजदरी ( विठे)येथील जि.प.प्रा.शाळा ही रोटरी हॅपी स्कुल हा उपक्रम राबविल्याबद्दल ‘ बेस्ट हॅपी स्कुल इन डिस्ट्रिक्ट प्लॅटिनियमम अवॉर्ड ‘ ने सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब च्या पर्यावरण क्षेत्रात रोटरी सदस्य संदीप मालुंजकर यांनी गेल्या काही वर्षांपासून अनेक संस्थांना, शाळेना ४०००० वृक्ष रोपे मोफत वाटप केल्याबद्दल ‘ मॅक्सिमम ट्री प्लॅनिटेशन गोल्डन अवॉर्ड ‘ ने सन्मानित करण्यात आले.
अकोले शहरात तालुक्यातील नागरिकांसाठी कायमस्वरूपी नेत्र तपासणी केंद्र सुरू केले व त्या माध्यमातून ३४ गावात अंध मुक्त गाव अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबीर घेऊन ३८४१ नागरिकांचे डोळे तपासले व २८१ नागरिकांचे ऑपरेशन केले.त्याबद्दल ‘ बेस्ट डिस्ट्रिक्ट इंफासीस प्रोजेक्ट avoidable blindness गोल्डन अवॉर्ड ‘ ने सन्मानित करण्यात आले.
सन २०२४- २५ या वर्षात शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन सर्टिफिकेट ‘ आणि रोटरी क्लब मध्ये रोटरीयन म्हणून उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांना डिस्ट्रिक्ट ३१३२ मधून ‘ स्टार रोटरीयन ऑफ द इयर ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमा व्यतिरिक्त अनेक शाळांना वह्या वाटप,43 इंची टीव्ही,कॉम्प्युटर वाटप,शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी म्हणून अगस्ति विद्यालयामध्ये इन्ट्रॅक्ट क्लब ची स्थापना,मुलींना सायकली वाटप, 03 एकल महिलांना पिठाची गिरणी वाटप, कुपोषित बालकांना औषधे वाटप,काविळ रुग्णांना औषधे वाटप,गरजूंना उपचारासाठी आर्थिक मदत, संसार उपयोगी साहित्य वाटप, रोटरी फॅमिली स्नेह मेळावा,रोटरी सदस्य यांचे वाढदिवस, शहीद वीर जवान संदीप गायकर यांना अभिवादन,असे विविध उपक्रम राबविलेले आहे.
या कामी सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सह सचिव समीर सय्यद,खजिनदार संदीप मोरे,पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख आदीसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची भावना अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल ला पाच पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


