पुण्य वार्ता
अकोले( प्रतिनिधी)- अकोले तालुक्यात सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने दिले जाणारे राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कारासह यावर्षी व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड व विशेष साहस गौरव पुरस्कार प्रदान सोहळा रोटरी क्लब 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ .सुरेश साबू व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आ.सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब अकोले चे अध्यक्ष रो.प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.
हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दि.30ऑगस्ट रोजी दुपारी 12-30 वाजता अकोले येथील अगस्ति महाविद्यालयाच्या के.बी.दादा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी रोटरी क्लब तर्फे तीन गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आटा चक्की चे वाटप व शालेय विद्यार्थ्यांनिंना शाळेत येण्या – जाण्यासाठी पाच सायकलीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी डिस्ट्रिक्ट 31320च्या डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. डॉ.सौ.गादिया ,फर्स्ट लेडी सौ.निर्मलाताई साबू, असिस्टंट गव्हर्नर विनोद पाटणी, संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सुनील नवले, सचिन आवारी हे उपस्थित राहणार आहेत.
दगडू दशरथ वाकचौरे (जि.प. प्रा. शाळा उंचखडक खुर्द),राजेंद्र वाळू भांगरे (जि.प. प्रा. शाळा कुमशेत),
पंडित तानाजी कदम (जि.प. प्रा. शाळा पळसुंदे),सुवर्णा भगवान जाधव (जि.प. प्रा. शाळा कळस),
सुनील संजय फाळके (जि.प. प्रा. शाळा मुली, राजूर),सुनील पांडुरंग शेळके (कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळदरी),नामदेव रामनाथ कासार (अनुदानित आश्रम शाळा शेंडी),
पोपट सोमा सदगीर (अगस्ति विद्यालय कळस),सुधीर एकनाथ जोशी (मॉडर्न हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, अकोले),
प्रा.विवेक विष्णू वाकचौरे (अगस्ति कला, वाणिज्य,व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले),
प्रा.संदेश दशरथ कासार (अगस्ति कला, वाणिज्य,व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले),यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
तर वेल्डिंग क्षेत्रात यशस्वी व कुशल कारागीर म्हणून भानुदास भिकाजी वाकचौरे,अकोले यांना व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड जाहीर झाला आहे.
त्याच प्रमाणे दिव्यांग गिर्यारोहक असलेले व 111 गडकिल्ले सर करणारे केशव किसन भांगरे,अकोले
यांना विशेष साहस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे नम्र आवाहन रोटरी क्लब अकोले सेन्ट्रलचे सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सहसेक्रेटरी समीर सय्यद, खजिनदार संदीप मोरे,पब्लिक इमेजचे डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख,माजी अध्यक्ष सचिन देशमुख, माजी अध्यक्ष सचिन शेटे, माजी अध्यक्ष डॉ .रवींद्र डावरे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

