पुन्य वार्ता
गणोरे – प्रतिनिधी
गणोरे ( ता- अकोले ) येथील अंबिका माता देवस्थानच्या नविन विश्वस्त व्यवस्थेच्या नेमणुकी संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून एकमत होत नव्हते. अखेर अहिल्यानगर येथील धर्मदाय उप आयुक्त यांनी अंबिका माता देवस्थानच्या पंधरा विश्वस्तांची नेमणुक मुलाखती द्वारे करण्यात आली.

अंबिका माता देवस्थानच्या ट्रस्टीसाठी अहिल्यानगर येथील धर्मदाय आयुक्ताच्या कार्यालयात ७९ उमेदवारांनी अर्ज सादर करण्यात केले होते. यापैकी ७६ उमेदवार मुलाखती साठी हजर होते. त्यांच्यावर आलेल्या हरकतींचा विचार करून मंगळवार दि. ५ ऑगस्ट रोजी धर्मदाय उप आयुक्तांनी आदेश काढुन पुढीलप्रमाणे १५ विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली. दिनकर शंकर दातीर, अनिल किसन आंबरे, राजेंद्र दादा आंबरे, सुनीता विष्णू आहेर, छाया विजयकुमार आहेर, शांताराम शिवराम दातीर, दिलीप दादाभाऊ पवार, प्रकाश बाळासाहेब भालेराव, पांडुरंग विष्णु खातोडे, राजेंद्र संपत आंबरे, संदीप रावसाहेब आंबरे, नवनाथ धोंडीबा दातीर, सोमनाथ अशोक आहेर, किरण शिवाजी आहेर, निलेश रामहरी आंबरे.
अखेर गेल्या चार ते पाच वर्षा पासून रखडलेल्या गणोरे येथील अंबिका देवस्थान च्या विश्वस्त व्यवस्थेची नेमणुक करण्यांत आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


