पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती सोहळा कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळदरी ता.अकोले येथे संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटील नवले होते. प्रमुख वक्त्या अगस्ती महाविद्यालयाच्या उपक्रमशील प्राध्यापिका डॉ. रंजना कदम तसेच प्रमुख अतिथी म्हणून अक्षर भारती पुणे चे भानुदास आभाळे ,दूधगंगा पतसंस्थेचे चेअरमन डॉ. निलेश चासकर ,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक कैलासराव शेळके ,जनलक्ष्मी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी आत्माराम रंधे, आकाश रंधे, सुनंदा घोडके ,संतोष मेंगाळ,रमेश मेंगाळ,अशोक निकम,सुनिल सुर्यवंशी हे उपस्थित होते
सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची ढोल ताशासह मिरवणूक काढण्यात आली .आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लेझीम सादर केले.तसेच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. भाऊ पाटील नवले यांनी कर्मवीरांबद्दल विचार मांडले यात त्यांनी वीटभट्टी वरील पालकांच्या विद्यार्थ्यांनी अनु भट्टीपर्यंत प्रवास करावा असे गौरव उद्रगार काढले .खऱ्या अर्थाने पिंपळदरी आश्रम शाळेमध्ये कर्मवीरांचे स्वप्न साकार झाले असे विचार मांडले. कार्यक्रमाचे व्याख्यात्या अगस्ती महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. रंजना कदम यांनी कर्मवीरांचे बालपणापासून ते रयत शिक्षण संस्थेची स्थापना तसेच कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्या आपल्या मनोगतात म्हटला की, “अण्णांनी आयुष्यभर गरिबातील गरीब, खेड्यापाड्यातील, डोंगरदऱ्यातील, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी आयुष्यभर प्रचंड परिश्रम घेतले. सर्व जाती- धर्माचे विद्यार्थी ही माझी लेकरे आहेत. या भावनेने या मुलांना सर्व संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. या कार्यासाठी आयुष्यभर या गावोगाव फिरून मदत मिळवली. शिक्षणाशिवाय दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा संपणार नाही. खरे निष्ठावान, प्रामाणिक लोक असतील तर पैशावाचून कोणाचेही शिक्षण आडणार नाही. माझा विद्यार्थी कष्टाची लाज न बाळगणारा, स्वाभिमानी , स्वातंत्र्य, समता पाळणारा आणि अन्यायाला प्रतिकार करणारा असेल. कर्मवीरांचा त्याग, निष्ठा, प्रामाणिकपणा कोणीच विसरू शकणार नाही. कोणतेही काम मनापासून, निस्वार्थी वृत्तीने, जिव्हाळयाने केले तर त्याचा व्याप हळूहळू प्रचंड मोठा होतो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी फक्त विचार मांडले नाहीत तर ते स्वतः त्या विचारानुसार जगले.” सर्व विद्यार्थी हे विचार मंत्रमुग्धपणे ऐकत होते .अक्षर भारती पुणे चे भानुदास आभाळे यांनी देखील कर्मवीरांचा जीवनप्रवास विशद केला.या प्रसंगी सह्याद्री विद्यालयाच्या माजी शिक्षिका व दानशुर व्यक्तिमत्व श्रीमती.शकुंतला धुमाळ यांनी आपल्या मातोश्री कै. सुगंधाबाई नामदेव धुमाळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ पिंपळदरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी बोअरवेल करून देण्यासाठी 51 हजार रुपयाचा धनादेश शाखेचे मुख्याध्यापक धनंजय मलाव व शिक्षक सुनील शेळके यांच्याकडे सुपूर्त केला. कैलासराव शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व शाखा इतिहास शाळेचे मुख्याध्यापक धनंजय मलाव यांनी मांडला. पाहुण्यांचा परिचय सुनील शेळके यांनी करून दिला. मान्यवर ,उपस्थित पालक, ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी यांचा तसेच शाखेला सदैव मदत करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राधेश्याम जगधने, मंदा घुले, संगीता आंबरे, छाया ठोकळ, शितल गिरी,भाऊसाहेब राऊत ,शंकर कडाळे ,विठ्ठल चौधरी ,अशोक कोरके, प्रवीण जगताप ,योगेश येवले , मंगेश निकम ,प्रमोद कोल्हे,बाबासाहेब नरळे,मारूती कुदळे,बाळासाहेब जोरवर,विजय यादव,दत्ता जाधव,कुणाल घोडके,लक्ष्मण खंडागळे ,पुष्पा शिंदे,अलका गुळवे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सहाने यांनी केले तर आभार राधेश्याम जगधने यांनी मानले.

