पुन्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
नाशिक विभागातील अग्रगण्य व विश्वासार्ह असलेल्या संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेच्या आश्वी (बु.) शाखेचे नवीन जागेत स्थलांतर होत असून, त्यानिमित्ताने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे लोकनेते मा. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या कार्यक्रमाला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. सत्यजितदादा तांबे, संगमनेर नगरपालिकेच्या मा. अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, तसेच एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या विशेष प्रसंगी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. राणीप्रसाद मुंदडा यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले आहे.

