पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधि )सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ च्या इंडियन फिजिक्स असोसियेशन यांचे तर्फे देण्यात येणारा “डॉ. एम.आर.भिडे” पुरस्कार अगस्ती महाविद्यालय चे “प्रा.विवेककुमार वाकचौरे” यांना प्रदान करण्यात आला.
पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठांत सी.व्ही. रामण सभागृह मध्ये आयोजित कार्यक्रमात लोकमत वृत्तपत्राचे संपादक संजय आवटे यांचे हस्ते व माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली अन पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संजय ढोले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य ह.भ.प. विष्णू महाराज वाकचौरे, डॉ. सचिन आंबरे, सौ. पुष्पाताई वाकचौरे, सौ. मनीषा वाकचौरे, हे उपस्थित होते.
प्रा. विवेक वाकचौरे यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल व फिजिक्स विषयातील योगदानाबद्दल संपूर्ण पुणे विभागातून एक असा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. विवेक वाकचौरे हे अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते महाविद्यालयात विज्ञान विभाग प्रमुख असून अकोले तालुका शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन असून कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांना रोटरी क्लब अकोले च्यावतीने देण्यात राष्ट्र बांधणी चे शिल्पकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

