पुन्य वार्ता
अकोले | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व अकोले यांच्या वतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता अकोले तालुक्यातील मातोश्री लॉन्स, राजूर रोड, इंदोरी फाटा येथे एक प्रेरणादायी आणि गौरवशाली सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारिता आणि सेवाभावाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस मा. डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी आणि समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना उचित सन्मान मिळावा हा प्रमुख उद्देश आहे.
शुभ हस्ते सत्कार करणारे मान्यवर:
अकोले तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. डॉ. किरण लहामटे,
विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य
धर्मसेवक मा. डॉ. सोन्या पाटील, अध्यक्ष – समाज कल्याण न्यास, एक समाजहितैषी नेतृत्व
ज्येष्ठ समाजसेवक मा. नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला, अध्यक्ष – एन के टी ट्रस्ट, ठाणावाला – समाजकारणात सक्रिय
प्रमुख उपस्थित मान्यवर:
मा. किरण लोहरे – राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते
मा. सिद्धार्थ मोरे – तहसीलदार, अकोले
मा. मोहन बोरसे – पोलीस निरीक्षक, अकोले पोलीस स्टेशन
मा. देवकन्या बोकडे – प्रकल्प अधिकारी, राजूर
मा. नवनाथ जाधव – राज्य प्रसिद्धी प्रमुख
मा. अरविंद कुमावत – गटशिक्षण अधिकारी
मा. किशोर पाटील – संपादक, दैनिक स्वराज्य तोरण
मा. घनश्याम माने – करिअर मार्गदर्शक
मा. सुनिल दातीर – अध्यक्ष, अ.ता.ए.सो., अकोले
मा. अनिल राहणे – उत्तर महाराष्ट्र सचिव
मा. सोमनाथ काळे – जिल्हाध्यक्ष (उत्तर), महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
प्रा. विद्याचंद्र सातपुते – जिल्हा उपाध्यक्ष
मा. भाऊसाहेब वाकचौरे – जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील अनेक शाळांमधून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजहितासाठी निःस्वार्थ कार्य करणारे, पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणारे, प्रशासनात समाजाशी बांधिलकी ठेवून काम करणारे अधिकारी यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक:
मा. डॉ. विश्वासराव आरोटे – राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
मा. अशोकराव उगले – तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अकोले
मा. दत्ता जाधव – तालुका कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अकोले
मा. हरिभाऊ फापाळे – तालुका सचिव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अकोले
जगन्नाथ आहेर
(तालुका उपाध्यक्ष)
वसंत सोनवणे
(तालुका उपाध्यक्ष)
ललित मुतडक
(तालुका उपाध्यक्ष)
अशोक शेळके
(तालुका उपाध्यक्ष)
सचिन लगड
(सहसचिव)
प्रवीण धुमाळ
(सरचिटणीस)
दत्ता हासे
(सहसंघटक)
राजेंद्र माळुंजकर
(सह संघटक)
गणेश रेवगडे
(निवडणूक समिती प्रमुख)
सचिन खरात
(इले. मीडिया प्रमुख)
शुभम फापाळे
(सोशल मीडिया सचिव)
सुरेश देशमुख
(संघटक)
दत्तू जाधव
(प्रसिद्ध प्रमुख)
सुनील आरोटे
(प्रसिद्धी प्रमुख)
राजेंद्र राठोड
(प्रसिद्धी प्रमुख)
संजय गायकर
(संपर्कप्रमुख)
निलेश वाकचौरे
(प्रकल्प प्रमुख)
संजय फुलसुंदर
(राज्य प्रचार प्रमुख)
भागवत खोल्लम
(खजिनदार)
सुनील शेणकर
(सोशल मीडिया प्रमुख)
शंकर संगारे
(हल्लाविरोधी प्रमुख)
ओमकार अस्वले
(सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख)
सतीश फापाळे
(सोशल मीडिया प्रमुख पठार भाग)
निखिल भांगरे
(रजिस्टार)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम हा केवळ गौरवाचा नव्हे, तर समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम ठरणार आहे.
कार्यक्रमासाठी पत्रकार, पालक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष अशोकराव उगले यांनी केले आहे.

