पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांना दीपावली च्या व पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी राजूर येथील निवासस्थानी दरवर्षी मोठी गर्दी होत असते.मात्र या वर्षी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे ब्रेनस्ट्रोक मुळे नाशिक येथे रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या सेवेसाठी त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभवराव पिचड हे नाशिक येथे थांबलेले आहेत.तसेच आदर्श सरपंच सौ हेमलता ताई पिचड ह्या सुद्धा आजारी असल्याने यावर्षी राजूर येथील निवासस्थान हे सुनसान झालेले दिसत आहे. अशा परिस्थितीत आपले दुःख विसरून जनतेला दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सून सौ.पूनम वैभवराव पिचड, दुसरी सून सौ. स्वप्नाली,नात डॉ.मधुरा वैभवराव पिचड,नातू यश वैभवराव पिचड व दुसरी नात यांनी राजूरकरांना,व्यापाऱ्यांना त्यांच्या घरात, दुकानात जाऊन शुभेच्छा दिल्या.
सध्या
अकोले विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांचे कुटुंबीय देखील दुःख हृदयात ठेवून तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत पोहचले आहे . यावेळी राजूर मध्ये आमदार डॉ किरण लहामटे यांचीही शुभेच्छा रॅली निघाली होती. मात्र त्याचवेळी माजी आमदार वैभव पिचड यांच्या पत्नी सौ. पूनमताई,मुलगी डॉ.मधुरा, मुलगा यश भावजयी स्वप्नाली व पुतणी, ग्रामपंचायत उपसरपंच,महिला सदस्य व कार्यकर्त्यांनी रॅली काढून जनतेला शुभेच्छा दिल्या . यावेळी बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळाली कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा दिल्या तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोर आले असताना चि .यश वैभवराव पिचड यांनी समोरून येणाऱ्या आमदार डॉ. किरण लहामटे यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचा आदर राखून त्यांच्या पायाला हातही लावुन दर्शन घेतले त्यावेळी आमदार डॉ.लहामटे हे देखील सदगदीत झाले. यश च्या या कृतीचे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व उपस्थितांनी कौतुक करताना यशच्या संस्काराचे गोड कौतुक केले. राजकारणाचा दर्जा ढासळला असला तरी यशच्या कृतीमुळे राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घातलं हे मात्र खरे .याची चर्चा अकोले मतदार होत असून या पिचड परिवाराच्या सुसंस्कृतीचे व्हिडीओ संपूर्ण संघात फिरत आहेत. व त्याचे जोरदार कौतुक होत असून स्वागत होत आहे.
चौकट-
माझे आजोबा माजी मंत्री वंदनीय पिचड साहेब, ,आजी सौ.हेमलताताई आजारी आहेत. माझे वडील माजी आमदार वैभवराव पिचड हे त्यांची काळजी घेत आहेत तर कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या आग्रहामुळे माझ्या वडिलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे .आम्ही त्या जनतेच्या प्रेमातून ऋणातून उतराई व्हावे म्हणून आम्हाला दुःख असले तरी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत,दर दिवाळीला आमच्या बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र या वर्षी आम्ही तुम्हाला तुमच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत ,तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही ऋणी आहोत .
डॉ मधुरा पिचड, व चि.यश पिचड


