पुण्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी :संजय गोपाळे
तब्ब्ल 44 वर्षातून एकत्र येणे म्हणजेआजचा हा सुवर्ण योग म्हणावा लागेल…निमगाव पागा येथील श्री. ज्ञानेश्वर इंग्लिश स्कुल मध्ये 1980 मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा स्नेह मेळावा…आजचे साठीतील मोठे लोक स्नेह मेळाव्याच्या च्या नित्ताने एकत्र येऊन एक नवीन आदर्श निर्माण केला आहे… (अभी तो हम जवान हे )या जोश्यात आजचा सुवर्ण हा दिवस…. विद्यालयातील माजी विद्यार्थिनीच्या हॉटेल मध्ये स्नेह मेळावा साजरा करण्यात आला होता.
आपल्या विद्यार्थी दषेतील आठवविना उजाळा देत सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केले…. प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख येत असतात परंतु याही वयात आनंदी राहण्यासाठी मागील आठवणी जागृत करून प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा या साठी यातील उदयोजक गोरक्ष कवडे, हॉटेल व्यवसाय अशोक डुंबरे,व्ही आर.कानवडे व भानुदास वाकचौरे यांनी गेली 1 महिन्या पासून सातत्याने आपल्या शाळेतील मित्र परिवाराला एकत्र आण्यासाठी प्रयत्न केले…. विद्यार्थी दषेतील त्या काळातील महिला, पुरुष यांना एकत्र करून तब्बल 44 वर्षातून एकत्र आण्याचा सुवर्णं योग घडून आणला.
प्रत्येक व्यक्तीने आपापले मनोगत व्यक्त केले…. या मध्ये काही लोक शिक्षक झाले, इंजिनियर, ऑफिसर,खाजगी व सहकारी क्षेत्रात नोकरीं, महिला उदयोजक हॉटेल व्यवसायिक, सहकार क्षेत्रात सोसायटी चेअरमन, शेतकी संघ संचालक, आचारी व आदर्श शेतकरी अशी सर्वांची ओळख झाली… सर्वांनी आपल्या लहान पणाच्या अनेक गोष्टी एकमेकांना शेअर करत नसोक्त गाण्याच्या ठेक्यावर नृत्य केले. व आपल्या या वयात एकमेकांना आरोग्याची काळजी घ्यावी व आनंदी राहावे या साठी शुभेच्छा देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी गोड जेवणाचा आस्वाद घेतला.
साठीतील असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपला अविस्मरणीय स्नेह मेळावा साजरा केला.याप्रसंगी पुणे येथील उद्योजक गोरक्षनाथ कवडे, आदर्श शेतकरी भारत गोपाळे, प्राध्यापक अण्णा कानवडे, जे. पी. कानवडे, सिंधुताई आरोटे, मंदा आरोटे, विद्युलता काशीद, स्नेहलता वामन, सुभद्रा कानवडे, हेमलता भोर, खिलारी पी एन, भानुदास वाकचौरे, अशोक डोंगरे,व्ही.आर.कानवडे, बाळासाहेब नवले, शेतकी संघाचे विद्यमान संचालक भास्कर गोपाळे, सूर्यभान गोपाळे, सुनील डुबे, रमेश कानवडे, सूर्यभान कानवडे, मारुती कानवडे, निवृत्ती कानवडे, तानाजी कानवडे, शिवाजी कानवडे, सुभद्रा लांडगे, भानुदास वाकचौरे, नेताजी कातोरे, भगवान कानवडे, चंद्रभान कानवडे, सदाशिव कानवडे, सूर्यभान गोपाळे,सयाजी कानवडे, भानुदास वाकचौरे, जालिंदर कानवडे, शिवनाथ कानवडे, नानासाहेब कासार, तुळशीराम खिल्लारी,इत्यादी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
