पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अगस्ती सहकारी साखर कारखान्याने मागील म्हणजे सन 2023-24 च्या गळीत हंगामांसाठी शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त 100 रुपये प्रती मे टन नुसार पैसे वर्ग केले, आणि 2800 रुपये प्रती मे टन बाजार भाव दिला, जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा 200-400 रुपये मे टन तोटा सहन करावा लागला याला जबाबदार कोण..? मुळातच कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक लागली तेव्हा अकोले तालुक्याचे आमदार मा. किरण लहामटे यांनी पॅनलचे नेतृत्व केले होते,अर्थात तेच पॅनलचे अध्यक्ष होते शेतकरी सभासदांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पॅनल निवडून दिला, अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत अनेक आश्वासने मा.आमदार किरण लहामटे यांनी दिले होते, एवढेच काय तर प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील अनेक आश्वासने मा. आमदार किरण लहामटे यांनी दिले होते, याही सभेत ते बोलले कि तात्काळ भ्रस्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई चालू करावी व पैसे वसुल करावेत प्रत्यक्षात मात्र काहीच नाही, तेच पैसे वसुल केले असते तर आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य तो मोबदला मिळाला असता व कामगारांना त्यांचे हक्काचे थकीत वेतन मिळाले असते, मात्र मा. आमदार लहामटे यांना तालुक्यातील सहकारी संस्था टिकवण्यात कोणताही रस नाही, तेथे जायचे आश्वासन द्यायचे आणि निघून यायचे, म्हणजेच काय तर राजा बोले अन दाढी हाले. यापेक्षा वेगळं काहीच नाही.त्यामुळे आज हजारो ऊस उत्पादक सभासदांची फसवणूक झालेली आहे, आणि यापुढे अगस्ती कारखान्याला कोणतेही कर्ज उपलब्ध होणार नाही, त्यामुळे यापुढे अगस्ती कारखाना टिकवायचा असेल तर भ्रस्टाचाराची रक्कम 50-60 कोटी (अंदाजे ) खातेप्रमुखांकडून वसुल करावी व अगस्ती कारखाना टिकवावा आणि त्यासाठी दिलेला शब्द पाळणारा आणि दिलेल्या आश्वासनांवर कार्यवाही करणारा योग्य तो आमदार अकोले तालुक्यातील जनतेने निवडून द्यावा असे मत संदीप भाऊसाहेब शेणकर यांनी व्यक्त केले.
