पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- नुकत्याच झालेल्या अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या संचालक मंडळाची निवडणूक झाली त्यामध्ये शेतकरी विकास मंडळाचे सर्व संचालक निवडून आले .
आज निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली
सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन
पदासाठी निवडणूक प्रकिया पार पडली.यावेळी चेअरमन पदासाठी मिलिंद नवले तर व्हा.चेअरमन पदासाठी उत्तमराव धुमाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.मिलिंद नवले यांना सूचक म्हणून वसंतराव धुमाळ व अनुमोदक म्हणून अनिल गायकवाड यांनी सही केली तर उत्तमराव धुमाळ यांच्या अर्जावर सुचक म्हणून सुनील नवले यांनी व अनुमोदक म्हणून रामहरी चौधरी यांनी सही केली.
यावेळी सर्व संचालक मा. वसंतराव धुमाळ,गंगाराम धुमाळ,अनिलराव गायकवाड,
सुनील नवले, एकनाथ मंडलिक , दत्ताञय शेणकर,रामहारी,चौधरी, हेमंत दराडे,सौ. हिरा नाईकवाडी, सौ. विमल झोळेकर, दिनकर जगताप,
हे उपस्थित होते.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन रावसाहेब नवले यांनी काम पाहिले.
निवडणूक प्रक्रिया संपल्यावर नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी
उत्तमराव धुमाळ सर उल्लेख करणे
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, शिवाजी राजे धुमाळ,महेशराव नवले, मच्छिंद्र शेठ धुमाळ, रमेश राव जगताप, बाळासाहेब नाईकवाडी, सचिन शेटे परशराम शेळके, बाळासाहेब ताजणे, अण्णासाहेब नवले, अनिल नवले, राधाकिसन रामचंद्र धुमाळ, मच्छिंद्र मंडलिक व रघुनाथ शेणकर यांनी विशेष सहकार्य केले.
चेअरमन मिलिंद नवले यांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या व्यवस्थापक पदाचा अनुभव असून उत्तमराव धुमाळ सर यांनी या पूर्वी अकोले सोसायटीचे चेअरमन पद सक्षमपने सांभाळलेले आहे.विशेष म्हणजे ते दोघेही एम कॉम असून वर्गमित्र आहेत. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
