पुन्य वार्ता
संगमनेर खुर्द प्रतिनिधी:
संगमनेर तालुक्यातील निमगाव बु,ग्रामपंचायती मध्ये लाखो रुपयाचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्या नंतर, याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून निमगाव बुद्रुक ग्रामपंचातिला टाळे ठोकल्यामुळे निमगाव पागा ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख इंजि. आशिष कानवडे यांनी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, निमगाव बु, ग्रामपंचायत मध्ये आर्थिक निधीची मोठी अफरातफर झाल्याचे आरोप होत आहे. सदर गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन करून निमगाव बु, ग्रामपंचायतीचे टाळे उघडावे. सदर प्रकरणी तातडीने चौकशी करून गावची व शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून जनतेच्या पैशाची चोरी थांबवावी अशी मागणी केली आहे.
सदर ग्रामपंचायत मध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोषी असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. सदर कारवाई न झाल्यास स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख इंजि.आशिष कानवडे हे सदर प्रकरणी लासलुचपत विभागाकडे तक्रार करणारा असून, वेळ पडल्यास आमरण उपोषणाचा देखील त्यांनी इशारा दिला आहे.
