पुन्य वार्ता
गणोरे- प्रतिनिधी
माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अकोले तालुक्यातील गणोरे येथील शाखेच्या अध्यक्ष पदी विरेंद्र थोरात यांची तर उपाध्यक्ष पदी रावसाहेब आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अंबादास पर्बती दातीर, बाबासाहेब बाळासाहेब उगले, अशोक कारभारी उगले, केशव रामचंद्र मोरे, राजेंद्र आनंदराव भांगरे, डॉ. रेवनाथ गणपत वाकचौरे,
मोहन मारुती दातीर, केशव रामचंद्र चौधरी, शुभम किसन आंबरे, नानासाहेब चिमाजी वाकचौरे, राजाराम शिवराम वाकचौरे, बाळासाहेब भानुदास मोरे,नानासाहेब पांडुरंग नाईकवाडी, उषाताई रामदास शिंदे, अंजनाताई बाजीराव बोंबले यांची गणोरे शाखेच्या कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत महाराज डुंबरे, दानशूर व्यक्तिमत्व खिमजीभाई ठक्कर ठाणावाला,देवठाण शाखाध्यक्ष श्रीकांत शेठ सहाणे, माळशेज संस्थेचे संचालक मंडळ, शाखा कमिटी उपाध्यक्ष सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

