- पुन्य वार्ता
अकोले: ‘ जेथे जाईल तेथे फुलविन बाग चैतन्याची ‘ या उक्तीनुसार इंदोरीत गावठाणात रस्त्याच्या दुतर्फा नारळ वृक्ष संवर्धनातून आदर्श शिक्षक दिवंगत भाऊराव दगडू आवारी यांनी गावाची वृक्ष संवर्धनस्नेही गाव अशी इंदोरीची ओळख जिल्ह्याच्या पटलावर करून दिली असून आता हे कल्पवृक्ष पंचवीस वर्षांचे झाले आहेत. आवारी गुरूजी यांनी नोकरीच्या प्रत्येक गावात नुसते वृक्षारोपण नाहीतर वृक्ष संवर्धनातून शाळा परिसर फुलवला, ज्ञानदानाबरोबरच वृक्ष संवर्धनाचे काम करून आदर्श वस्तूपाठ विद्यार्थ्यांसमोर ठेवला.तालुक्यातील पिंपळगाव निपाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सभोवतालची झाडे त्याची साक्ष आहेत. इंदोरी प्राथमिक शाळेच्या आवारातील पिंपळवृक्ष डेरेदार दिमाखात उभा आहे. १९९८ गावात संपूर्ण दारुबंदी करून गाव जिल्हात चर्चेत आले.२००० साली विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार,श्रीविष्णू महायाग यज्ञ झाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायत पुढाकाराने नारळाची शेकडो झाडे लावली तेव्हा गाव राज्याच्या पटलावर आले. पुढे निवृत्तमहाराज यांच्या किर्तन सेवेतून गावाचे नाव देश व जगभर झाले. आवारी – येवले वाड्यापासून थेट प्रवरा नदीपाञापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व नदि काठावर जवळपास आडिचशे झाडे लावली गेली. वृक्ष संगोपणाची जबाबदारी सेवानिवृत्त शिक्षक भाऊराव दगडू आवारी यांनी स्विकारली.तळहाताच्या फोडाप्रमाणे राञदिवस मेहनत घेवून स्वतः झाडांना बादलीने पाणी घालून तब्बल तेरा चौदा वर्ष ही झाडे जोपासली. आता ही झाडे पंचवीसीत गेली आहेत.येवले काॅर्नर ते पिंपळ चौक व पिंपळ चौक ते चौधरी देवी मंदिर आजही नारळाची झाडे उंच उभी गुरूजींच्या श्रमसंस्कारांची आठवण करून देताहेत, गुरूजी राञी बारा वाजता तर कधी पहाटे तीन वाजता हातात बादली फावडे घेवून वृक्षसंवर्धनात मग्न झाडांच्या सोबत दिसायचे, गाव गुरूजींनी दाखवून दिलेली वृक्ष संवर्धनाची वाट कधी विसरणार नाही असे अशोकपाटील नवले, विद्याधर आग्रे, लक्ष्मण येवले, वकील सुनील नवले, शिवाजी कोठवळ, राजू ठोंबाडे, सुभाष थोरात, रवी देशमुख, गुलाब हासे, विजय चौधरी, अशोक पवार, संजय नवले, अर्जुन नवले, बाळासाहेब देशमुख आदि गावकरी सांगतात.
**** आवारी गुरुजीची भारत सेवा संघाचे संस्थापक आजिव सदस्य होते. इंदोरी, निंब्रळ, पेमगिरी येथे माध्यमिक विद्यालये उभारणीत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यांचे शैक्षणिक व वृक्ष संवर्धनाचे काम अतुलनीय आहे. गुरुजींचा कृतीशिल प्रबोधनाचा वारसा इंदोरी गाव पुढे नेत आहे. – समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, अध्यक्ष विठ्ठल मंदिर देवस्थान.
**** नारळाची झाडे संवर्धन करून कोकणासारख निसर्ग सौंदर्य इंदोरीत निर्माण करण्याच काम गुरूजींनी केलं, गावात आलं की नारळाची झाड गुरुजींची आठवण करून देतात.लगेच गुरूजी व त्यांची सायकल डोळ्यासमोर येते. गावाने उर्वरित नारळाची झाडे जोपासावी व अधिक वृक्षारोपण करावे – बाळासाहेब गायकवाड, उद्योजक नवी मुंबई.
**** गुरूजींनी जोपासलेल्या झाडांना नारळ लगडले, त्याचे थोडे उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळाले. मध्यंतरी एक दोनदा टॅंकरने पाणी घालून, तसेच पिंपळ चौकात हातपंपास विद्युत पंप बसवू उन्हाळ्यात झाडांना पाणी दिले.- संतोष गणपत नवले, माजी सरपंच
**** विजेच्या तारेला अडथळा येणारी काही झाडे ग्रामपंचायतीने काढली.गुरूजींनी वाढवलेली नारळाची उर्वरित झाडे गाव जोपासत आहे.प्रवरेकाठी काही झाडे लावलीत. – शिवाजी हासे, माजी उपसरपंच
