पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
लक्ष्यवेध फौंडेशन संचलित लक्ष्यवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षा 2025 अंतर्गत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत खुर्द शाळेने आपल्या पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले शाळेमार्फत प्रज्ञाशोध परिक्षेत चार विद्यार्थी प्रवेशित केले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी पात्र झाले आहे. इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांनी स्वरा योगेश जाधव हीने राज्यात 30 वा तसेच जिल्हात 25 वा क्रमांक गुणवत्ता यादीत पटकाविला आहे . तिच्या या यशाबद्दल खुप खुप कौतुक आणि अभिमान वाटतो . स्वरा जाधव ही एक हुशार ,अभ्यासू विद्यार्थी असून शाळेला तिचा अभिमान आहे. स्वराच्या या यशाबद्दल तिचे वर्गशिक्षक भागवत घुले सर तसेच शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री विलास शिंदे सर व लहीत खुर्द चे केंद्र प्रमुख श्री वाल्मिक बडे साहेब तसेच पंचायत समिती अकोले गटशिक्षणाधिकारी श्री अरविंद कुमावत साहेब आणि शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री अंकुश गोडसे सर व डॉ किशोर गोडसे, श्री योगेश जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रविण मिंढे सरपंच ताई सौ.अनिता गोडसे आणि इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ व यांनी विशेष कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

