पुन्य वार्ता
इगतपुरी : प्रतिनिधी
जनसामान्य व आदिवासी समाजात क्रांती घडविणारे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्ताने यांच्या प्रतिमांचे पुजन करून यांना अभिवादन करीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार बिरसा ब्रिगेड सहयाद्री / सातपुडा आदिवासी जनसेवक अनिल गभाले यांच्या प्रचाराची सुरवात करण्यात आली.
या प्रसंगी शेकडो आदिवासी बांधवांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी बहुल भाग असुन या भागातील आदिवासींच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न प्रलंबीत असुन शिक्षीत व सामाजिक दृष्टीकोन असलेला उमेदवार निवडुन विकासाला गतीमान करण्यासाठी अनिल गभाले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प हाती घेत समाज बांधव व सर्वसामान्य जनता एकवटल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.
शिक्षण, निवारा, पाणी, रस्ते, रोजगार यासह शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवुन इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागाचा कायापालट करण्याचा निर्धार करण्यासाठी अनिल गभाले यांनी उमेदवारी घेतली असुन त्यांची करवत या निशाणी समोरील बटन दाबुन विजयी करावे असे आवाहन अनिल गभाले यांनी केले.
या प्रचार रॅलीत मार्गदर्शन करीत अनिल गभाले यांनी आपल्या मनोगतातुन प्रबोधन केले.तालुक्यात सोनोशी येथे बाडग्याची माची या ठिकाणी अद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक आदिवासी समाजाच्या विकासाला बळ देणारे व स्फुर्तीदायी ठरेल असेहि ते म्हणाले याप्रसंगी उपस्थित प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत प्रचार रॅलीत सहभागी झाले.
या प्रसंगी युवानेता सचिन गभाले नवसु घारे, शिवाजी दराणे, संतोष निरमुडे अमृता भले, पांडुरंग पालवे ,संतोष हिलम, तानाजी शिंदे, बुधा मेंगाळ, रामदास भगत, बलराम घोडे, संजय शिंदे, आदि सह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते .
