पुन्य वार्ता
अकोले —प्रतिनिधी
आदिवासी उन्नती सेवा मंडळ या नामंकित शिक्षण संस्थेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र भांगरे यांचे मोलाचे योगदान असल्याचे मत माजी आमदार तथा संस्थेचे विश्वस्त वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले.
खडकी खु (ता.अकोले) येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक राजेंद्र भांगरे व स्वयंपाकी चिंधाबाई भांगरे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड, आमदार डाॅ.किरण लहामटे,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक यमाजी लहामटे, सचिव मंगलदास भवारी, अध्यक्ष भरतराव घाणे, संचालक गणपतराव भांगरे ,खनिनदार पांडुरंग खाडे, संचालक विठ्ठल भवारी, माधवराव गभाले, दुध संघाचे माजी संचालक चिमाजी वाळेकर, संचालक भरत घोरपडे, प्राचार्य दिलीप रोंगटे, इब्टाचे जिल्हाध्यक्ष भागवत लेंडे, सामाजिक कार्यकर्ते दगडु हळकुंडे शहाजीशेठ वाकचौरे आदिंची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासींना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून “आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना केली. संस्था संस्था सुरु करणे सोपे असते परंतु चालविणे खुप आवघड असते अशा वेळी योग्य व्यक्तीची पारख करने गरजेचे असते.संस्थेचे सचिव असलेले मंगलदास भवारी सर यांच्यावर हि जबाबदारी दिल्यानंतर राजेंद्र भांगरे यांच्याकडेही त्यावेळी गुरुवर्य काशिनाथ पिचड छात्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर संस्था विस्तारी करणाच्या कामात भांगरे सरांचा सहभाग वाढत गेला.

यावेळी अशोक भालेराव (मुख्याध्यापक शेंडी) ज्ञानदेव पिचड (मुख्याध्यापक मान्हेरे), विक्रम आरोटे (मुख्याध्यापक एकदरे) मारुती तातळे (मुख्याध्यापक शेंडी), सुखदेव बोहाडे (मुख्याध्यापक मान्हेरे) सुदाम सदगीर (मुख्याध्यापक खडकी), सुरेश भांगरे (मुख्याध्यापक देवठाण) शिवराम कोडार (मुख्याध्यापक कोथळे), प्रल्हाद नेहे मुख्याध्यापक एकदरे), शिरीश पाबळे (मुख्याध्यापक राजूर) सुधीर कानवडे (चेअरमन) श्रीमती मंजुषा घोडके (मुख्याध्यापक कोथळे), श्रीमती मिनाक्षी पाटील (मुख्याध्यापक देवठाण), वाहतुक नियंत्रक तुकाराम लोहकरे, अशोक पराड, किरण पराड गणेश मैड, कुंडलीक वाळेकर, भास्कर बांडे, भास्कर घोडे, पी.एस. भांगरे, भवानराव सदगीर, डॉ. अमोल भांगरे, अक्षय भांगरे, राजाराम राऊत, लक्ष्मण चिंधु भांगरे यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

