पुण्य वार्ता
अकोले :-
उंचखडक बु शाळेचा संघर्ष फार वाखान्याजोगा आहे. गावाला आणि माजी विद्यार्थ्यांना शाळेविषयी असणारी आत्मियता फार कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेता भविष्यात या शाळेतून सुजान नागरिक आणि आयएएस, आयपीएस अधिकारी घडतील. शाळेला माजी विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांची मदत केली आहे त्यामुळे, ते आपल्या शाळेचे संस्कार आणि उपकार विसरले नाहीत याचे विशेष वाटते. भविष्यात आज शिकत असलेली मुले देखील तीच जाणिव ठेवतील आणि ही शाळा बंद पडणार नाही याची निच्छित काळजी घेतील असे प्रतिपादन रणरागिणी फाउंडेशनच्या अध्यक्षा धनश्रीताई सुजय विखे यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचखडक बु येथे वर्षीक स्नेहसंमेलनाच्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व पद्मश्री राहिबाई पोपेरे व्यसपिठावर उपस्थित होते.
धनश्री विखे ताई म्हणाल्या. की, गावची शाळा टिकावी म्हणून आजी माजी विद्यार्थी आणि गावकरी त्यात विशेषत: तरुणांनी जे काही पाऊल उचलले त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. एक जिल्हा परिषदेची बंद पडलेली शाळा सुरू करण्याची धडपड ऍड. सागर शिंदे आणि त्यांच्या टिमने केली या कामगिरीचे तुलना सामाजिक क्षेत्राच्या इतिहासात नक्की घेतली जाईल. खरंतर मला उंचखडक बु हे गाव माहित नव्हते. पण, मी येथे आल्यानंतर शाळेचा आणि गावचा इतिहास ऐकल्यानंतर मला फार उत्सुकता वाटली. माझे बाळ छोटे असताना देखील मी शाळेतील बाल गोपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी इतक्या लांब आली आहे. भविष्यात थोडा जास्त वेळ काढून मी शाळेत येणार आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. गावची शाळा पाहिल्यानंतर येथील परिसर फार स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न करणारे वातावरण दिसले. त्यामुळे, खरोखर ही शाळा मला आदर्श वाटली आहे असे मत धनश्रीताई विखे पा. यांनी व्यक्त केले.
खा. वाकचौरे म्हणाले की, बंद पडलेल्या शाळेत मुलांना टाकावे यासाठी पालक तयार होत नाही. तरी देखील प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना विश्वास देऊन शिक्षणाचे महत्व पटवून विद्यार्थी घेऊन येणे हे वाटते तितके सोपे नाही. ही काम सागर शिंदे, रवि रुपवते आणि त्यांच्या टिमने केले आहे. गावाने देखील त्यांना मदत केली, माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करुन लाखो रुपयांची वर्गनी दिली म्हणून शाळेचा चेहरा बदलला. दिड वर्षात शाळा आयएसओ झाली, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात प्रथम क्रमांक आला, आदर्श शाळा म्हणून सन्मान मिळाला यापेक्षा शाळेत आणखी काय गुणवत्ता हवी? भविष्यात शाळेला काही मदत लागल्यास पहिला हात माझा असेल असे आश्वासन वाकचौरे यांनी दिले. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ विधिज्ञ वसंत मनकर, नितीन नाईकवाडी, अमोल बोर्हाडे, शालेय पोषण अधिक्षक आरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी महादेव हासे, गोवर्धन ठुबे, केंद्रप्रमुख सुनिल नरसाळे, बाळासाहेब आरोटे, भगवान बोरुडे, नवनाथ वलवे, भाऊसाहेब चासकर, डॉनियल रुपवते, रत्नमाला रुपवते यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. तर यावेळी आर्मीतून नुकतेच सेवा निवृत्त झालेले नवनाथ कुंडलिक मंडलिक, शाळेला सदैव मदत करणारे अक्षय देशमुख, पद्मश्री राहिबाई पोपेरे, ऍड. सागर शिंदे, मुख्याध्यापक रवि रुपवते, देविदास गिर्हे भाऊसाहेब देशमुख, महेश खरात यांचा ट्रॅफी, शॉल, बुके, संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसएमसीचे अध्यक्ष ऍड. सागर शिंदे, सागर शरद देशमुख, सागर त्र्यंबक देशमुख, उद्धव देशमुख, अक्षय देशमुख, शितल देशमुख, हर्षदा देशमुख, कोरिओग्राफर राहिणी खरात ऋषाली गिते, पुजा देशमुख, रेणुका देशमुख, संदेश खरात, भाऊसाहेब खरात, महेश जेजुरकर, महेश खरात, तुषार शिंदे, श्वेता शिंदे, सोनाली उद्धव देशमुख, प्रदिप उगले व अस्मिता ठुबे, शशिकांत देशमुख, नवनाथ मंडलिक, सुनिता रुपवते यांच्यासह अनेकांनी मदत केली. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे यांनी उत्तम रितीने केले.
भविष्यात उंचखडक बु शाळेतून शिव-फुले-शाहू-आंबेडकर निर्माण होतील, फक्त त्यांना ज्ञानासोबत सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला आहार दिला पाहिजे. रासायनिक खतांना माती मृत होत चालली आहे, निर्माण होणार्या आहरामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. येणारी पिढी सदृढ आणि सक्षम असावी असे वाटत असेल तर या पिढीतील विद्यार्थ्यांनी मातीला रसायनमुक्त करणे गरजेचे आहे. मी शाळा शिकले नाही पण मी भल्याभल्या पंडितांना हेच शिकवते आहे. की, आपली काळी माती अर्थात आईचे रक्षण करा. मी पद्मश्री आहे पण, तरी देखील जोवर मी अन्नाचे ताट विषमुक्त करीत नाही. तोवर माझे काम संपणार नाही.
- पद्मश्री राहिबाई पोपेरे
(बिजमाता)

