पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
खेळाची शान तर राष्ट्राची शान असल्याने नितिने पवित्र,मनाने निर्मळ तर शरीराने आरोग्य संपन्न रहा.असे विचार सत्यनिकेतन संस्थेचे सचिव एम.एल. मुठे यांनी व्यक्त केले.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर तसेच तालुका क्रीडा समिती अकोले यांचे संयुक्त विद्यमाने भव्य तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालय राजूर येथील कुस्ती संकुलनात संपन्न झाल्या.या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगि सचिव एम.एल.मुठे विचारमंच्यावरून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपप्राचार्य विलास नवले हे होते.
या प्रसंगि संचालक विजय पवार,विलास पाबळकर,शिक्षण निरिक्षक लहानु पर्बत,प्राचार्य बादशहा ताजणे, डॉ.भाऊसाहेब देशमुख,भालेराव सर,क्रीडा अध्यक्ष किरण चौधरी,आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच तान्हाजी नरके,जालिंदर आरोटे, विनोद तारू,एन.एल.जाधव,संदिप लगड, किशोर देशमुख,गणेश बोऱ्हाडे, बाळासाहेब चौधरी यांसह तालुक्यातील विद्यालयांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
प्रमुख अतिथि एम.एल.मुठे यांनी खेळाडूमध्ये प्रामाणिकपणा,खिलाडूवृत्ती,चपळता, ताकद असायला हवी.कार्यकिर्तीमागे ध्येय असल्याचे विचार प्रतिपादीत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.विलास नवले यांनी कुस्तीसाठी शक्ती,युक्ती,या दोन्हींचा मेळ असणे महत्वाचे असते. कुस्तीचा उगम रामायण महाभारत या प्राचीन काळापासून झाला असून,हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे. आपल्या परिसराची योग्यता असल्याने अशक्य असे काहीच नाही.खावटी कमी पण चिकाटी असल्याने कुस्ती कोच नरके सरांच्या रूपाने राजूरचे नाव संपूर्ण राज्यात गाजत असल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला.
संचालक विजय पवार, प्राचार्य बादशहा ताजणे यांनी कुस्तीचे महत्त्व विशद करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तालुका क्रीडा अध्यक्ष किरण चौधरी यांनी केले.
सुत्रसंचलन प्रा.सचिन लगड यांनी केले. तर मच्छिंद्र देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धा संपन्नतेसाठी तालुका क्रीडा समितीचे सर्व सदस्य,अध्यक्ष,उपाध्यक्ष,क्रीडा पंच, क्रीडा शिक्षक आदिंनी परिश्रम घेतले.


