पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी — उद्याचे विधानसभा निवडणूकीत या मतदार संघातून महाविकास आघाडिचा उमेदवार,तुतारीवाला माणुस निवडून दिल्यास या राज्यातले सरकार जाईल हे सरकार गेल्यावर भाजापाला धक्का बसेल व पुढील सहा महिन्यात देशातले सरकार कोसळून आपल्या विचाराचे सरकार येईल.२०१९ ला वर्गणी गोळा करुन ज्यानां आमदार केले त्यानी सगळ्या मर्गाने पैसे गोळा करणाऱ्याचे काम केले.आता त्याचे विरोधात लढायचे आहे.
इतके पैसे आले म्हणतात मग कुठे गेले,मला येताना रस्ते काही चांगले दिसले नाही. तु तिकडे चर कुरण इकडे मुंबईला येवून त्रास देवु नका असा कानमंत्रच नेत्यानी त्यांना दिला आहे .आता विधानसभेला समोरच्या बाजूने प्रचंड पैश्याचा पुर येईल मात्र अकोले तालुक्याची जनता खुप हुशार आहे तुमचा फायदा होत असेल तर निश्चित घ्या मात्र सकाळी उठून तुतारी वाजवा. हि तुतारी आई बहिणीच्या रक्षाणासाठी,तरुणाच्या हाताला काम देणारी आहे असे अवाहन करत आ.डॅा.किरण लहामटे यांचे नाव न घेता जोरदार टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रेची अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आज विराट सभा कोतुळ पब्लिक स्कूलच्या मैदानात संपन्न झाली यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील बोलत होते.केरुजी गवांदे हे अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे खा.निलेश लंके,युवक प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख,आ.सुनिल भूसारा, युवा नेते अमित भांगरे,श्रीमती सुनिताताई भांगरे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदिप वर्पे,सुनिल गव्हाणे,तालुकाध्यक्ष सुरेश गडाख,बी.जे.देशमुख,महिला तालुकाध्यक्षा भाग्यश्री आवारी,युवक शहराध्यक्ष राहुल शेटे,मा.जि.प.सदस्य रमेशराव देशमुख,दिलीप भांगरे,राजेंद्र कुमकर,विनोद हांडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते
पुढे बोलताना आ.जयंत पाटील म्हणाले कि
२०१९नंतर आपले महाविकास आघाडी सरकार असताना साम्रद व घाटघर येथील वळण बंधारे प्रस्तावित केले आहे.जलसंपदा मंत्री असताना पवार साहेबाचे मार्गदर्शनाखाली वळण बंधारे नाशिक, नगर जिल्ह्यात करण्यासाठी प्रकल्प केला वन खात्याची थोडी अडचण असल्याने ते काम थांबलेली आहे
.लोकसभा निवडणूकीत देशातील हे भाजपा सरकार घालवण्यासाठी ३१ खासदार राज्यातील जनतेने दिलेत त्यामुळे भाजपा व महायुतीचे सरकारचे लक्षात आले महाराष्ट्रात सत्ता येणार नाही त्यामुळे पाहिजे त्या घोषणा करत आहे तिजोरीत पैसे नसताना सरकार सव्वा लाख कोटीचे कर्ज निवडणूकी पुर्वी काढत आहे.कर्ज काढा काहीही करा पण आपले सरकार आणा असा आदेशच दिल्लीवरुन त्यांना आला आहे.काल महाराष्ट्रात येवून अमित शहा त्यांचे नेते, कार्यकर्तेना शरदचंद्र पवार,उद्धव ठाकरे या दोघाना रोखा असा संदेश देत आहे यावरून पवार साहेब व उद्धव ठाकरे याचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येत असल्याचेच अमित शहा यांनी मान्य केले आहे
राज्यात प्रत्येक सभेला उत्तम प्रतिसाद देत जनतेने महायुतीला दाखवून दिले आहे.
राज्यातील एक भजपाचा नेता मला भेटला व म्हणाला लोक म्हणतात तुतारी घ्या तरच निवडून येईल.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी भावना लोक व्यक्त करत आहे.उद्याची निवडणूकीत आमची लढाई धनदांडग्या सोबत आहे प्रत्येक जण म्हणतो एवढे कोटी आणले.मात्र वर्क ॲर्डर दिली घ्यायचे ते घेतले आणि आता सरकारकडे कामाचे द्यायला पैसे नाही .
सामाजिक न्याय, आदिवासी विभागाचे पैसे काढून पाहिजे तशी उधळपट्टी सुरु आहे.
अहमदशाह अब्दाली सारखे केद्रीय मंत्री अमित शहाने कांदा अफगाणिस्तानातुन आणला जेणे करुन देशातील शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये.शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव वाढु द्यायचे नाही हे धोरण भाजपा चे आहे. श्रीमंत लोकांचे चोचले पोसण्याचे काम करत आहे.शेतकऱ्यांचे प्रश्नाचे या सरकारला काही घेणे देणे नाही.जगात व देशात नितिशकुमार, चंद्राबाबु हे पलटिराम म्हणून प्रसिद्ध आहे पुढील वर्षी हे पलटिराम निश्चित पलटि मारतील व देशातील हे सरकार कोसळून आपल्या विचाराचे सरकार येईल.
आपले सरकार आल्यावर पोलिसांचे व्यवस्थेत बदल करुन महाराष्ट्रात माझ्या आई बहिणीला धक्का लावण्याची हिम्मत होणार नाही असे काम करु
एन्काउंटर केले कि झाले नक्की काय झाले हे माहित नाही मात्र अश्या लोकांना,गन्हेगारानां फाशी दिली पाहिजे हीच आमची भुमिका आहे मात्र त्या शाळेचे शाळा चालक, ज्या पोलिसांनी त्याचा गुन्हा लवकर दाखल करुन घेतला नाही त्या पोलिसांवर व त्या आरोपीला मदत करणाऱ्यावर कारवाईचे काय झाले असे अनेक प्रश्न आहे.
अकोले भागात इतका निसर्ग आहे कि कश्मिरला जायची गरज नाहि या मतदार संघातील पर्यटनासाठी काम होणे महत्वाचे आहे त्यामुळे आता भ्रष्टाचार विरोधी मतदान करण्यासाठी तुतारी हातात घ्या असे पाटिल यांनी सांगितले
याप्रसंगी खा.निलेश लंके म्हणाले कि आज शिवरायांचे विचारांचे सरकार येण्यासाठी हि शिव स्वराज्य यात्रा आहे.आज ख-या अर्थाने छत्रपती च्या विचाराची गरज आहे.आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाहि दुधाला भाव नाही.देशात शेतकऱ्यांची जाण असणारे एकमेव नेते पवार साहेब आहेत त्यांचे पाठीमागे उभे राहिले पाहिजे.अकोले भागातील विकास आज पवार साहेबामुळेच दिसतो आहे आता थांबायचे नाही आपल्या विचाराचा शरद पवार जयंत पाटील व राष्ट्रवादिचे विचाराचा आमदार २०२४ विधानसभेत पाठवा असे अवाहन खा.लंके यांनी केले
यावेळी खा.अमोल कोल्हे म्हणाले डोक्यावरील बापाचे छत्र हरपले तरी आपला राजकिय बाप बदलला नाही असा युवा नेता अमित भांगरे आहे.अकोले तालुक्याला खुप एतिहासिक महत्त्व आहे,क्रांतिकारकांचा तालुका आहे मात्र तालुक्याची मान गद्दारीमुळे झुकली आहे.पोरानी कितीही मोठा बंगला बाधला आणि बापाला घरातून हाकलून दिले तर त्या पोराला काय म्हटले पाहिजे मग तो गद्दारच असणार ना? आज हि शिव स्वराज्य यात्रेची सभा नाही तर या मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदार होणार आहे हे शिक्का मोर्तब करणारी सभा आहे. या पुरोगामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सटेजवरुन म्हणत होता आले का पैसे…आले का.. विचारत होते खालील लोक मनात म्हणत होते तुझ्या खिश्यातुन दिले का?
गुलाबी जॅकेटवाले तर ज्याचे मांडीवर जाऊन बसले त्याचेकडेच त्यांना जागा राहिले नाही.हात दगडाखाली होते म्हणून लाचारी पत्करली आता येतीन व सांगतीन विकास करायचा होता.विकासाचे गप्पा मारणारेनी तुमच्या तालुक्यात हिरडा प्रोसेसिंग प्लॅट का उभा राहिला नाही याचा जाब विचारावा.तालुक्यातील जनतेने स्वाभिमानी विचाराबरोबर राहत राष्ट्रवादि कॅाग्रेसचा आमदार द्यावा अशी साद खा.कोल्हे यांनी घातली.
यावेळी महेबुबभाई शेख म्हणाले २०१९ ला गद्दारी झाली त्यावेळी म्हणत होतो पावडर दुधाने बाळ व आैषधाचे गोळ्यांनी पैलवान तर पवार साहेबांना सोडून गेलेल नेता कधीही टिकत नाही.ज्याना आशेचा किरण म्हणून पाहिले तो गद्दारीचा किरण निघाला.ज्यावेळी अकोलेचा नेता पवार साहेबांना सोडतो त्यावेळी काय होते हे पिचडाचे वैभव वरुन दिसले.ज्यावेळी पवार साहेबांचे घर फोडले जात होते पवार साहेबांवर वेळ होती त्यावेळी आ.डॅा.लहामटे तुम्हाला विरोधात सही करायला काहि वाटले नाही का?बाप बदलणारी टोळी झाली हि उद्या बापाला जन्माला घातले तर उपकार केले का असे म्हणाले तर वेगळे काही नाही. लाडकी बहिण म्हणने दादाचे तोंडी शोभत नाही दादा तुम्ही तुमच्या बहिणीचे झाले नाही तेव्हा इतर बहिणीचे कधी होणार.हे सरकार प्रक्रल्प गुजरात मध्ये नेणार असाल तर त्यानी मते ही गुजरात मध्ये मागावी.लोकसभेला मराठा-ओबीसी वाद लावला आता हिंदु मुस्लिम वाद लावत आहे.आजची सभा पाहुन प्रवरानगरच्या डॅाक्टर सारखे आज कोणत्याही डॅाक्टरला झोप लागणार नाही गोळी घेतल्याशिवाय झोप येणार तेव्हा आता जनता अकोलेत गद्दारी गाडुन तुतारी वाजवणार आहे असा विश्वास व्यक्त केला.
तर युवा नेते अमित भांगरे म्हणाले कि कोणी कितीही डोळा महाराष्ट्रावर ठेवला तरी जोपर्यंत पवार साहेबांसारखा सह्याद्रीचा राजा उभा आहे तोपर्यत कोणताही डोळा महाराष्ट्राचे काही करु शकत नाही.वेगळी उर्जा जयंत पाटील यांचेकडून मिळते.२०१९ ला ज्याला वर्गणी काढून आमदार केले त्याने पवार साहेबांशी गद्दारी केली आता त्या गद्दाराला धडा शिकवायचा आहे.तालुका पवार साहेबांच्या विचाराबरोबर कायम राहिला आहे यापुढेही राहील.सरकारची १५०० ची लाचार नको दुधाला भाव द्या, शेतमालाला भाव द्या.सरकार आदिवासी बजेटमधुन पैसे लाडकी बहिणींना देत आहे.आमचा धनगराना विरोध नाही परंतु ज्याला आरक्षण द्यायचे ते स्वतंत्र द्या.आमच्या आदिवासीच्या आरक्षणात धनगराना घुसवु नका. वर्गणी काढून निवडून दिलेला आज लोकाना भिकार भंगार म्हणून माज घालत आहे त्यांना त्याची जागा दाखवून द्यायचे आहे.मला कुठल्याही प्रकारे टक्केवारी घ्यायची नाही फक्त तालुक्याचे जनतेची सेवा करायची तालुक्याला पर्यटन तालुका निर्माण करायचा आहे अशी भावना व्यक्त केली आज सकाळी कोतुळ शहरातून भव्य मिरवणुकीने वाद्यवृंदाचे स्वरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खा.अमोल कोल्हे, खा.निलेश लंकेचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमस्थळी सुरूवातीला लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा हे वग नाट्य सादर करत महाविकास आघाडिचा विचार दाखवण्यात आला.तर आदिवासी नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कुमकर,युवक शहराध्यक्ष अमित नाईकवाडी,चंद्रकांत घुले,विनोद हांडे,संपतराव नाईकवाडी,सुनिल गव्हाणे,अभिजित वाकचाैरे,सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुकुंद भोर यांनी केले.
उमेदवारी बाबत अधिकृत घोषणा नाही
३० तारखेला महाविकास आघाडिचे जागावाटप होईल त्यानंतर आपल्या वाट्याला येणाऱ्या जागा निश्चित झाल्यावर उमेदवारी जाहिर करायची असते इतर दोन सहयोगी पक्ष आहे त्याचा सन्मान राखला पहिजे त्यामुळे आजच उमेदवारी जाहिर करता येणार नाही मुहूर्तावर घोषणा झाली पाहिजे पितृपक्ष सुरु आहे.मागच्या विधानसभेत स्व.अशोकरावाचा प्रमुख रोल होता ज्याना मदत करुन आमदार केले त्यानी आपला पक्ष सोडुन गेले.स्व.अशोकराव असते तर तेच आज उमेदवार असते असे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यानी म्हणत अकोले मतदारसंघातील उमेदवारी मात्र जाहिर केली नाही.

१) राजुर येथे मल्टिस्पेशालिस्ट हॅास्पिटल उभारणार.
२) महिलांना सक्षम करण्यासाठी तालुक्याला महिला दुध संघाची निर्मिती करायची
३) भंडारद-यात आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे सृष्टी उभी करायचे आहे.
पुढिल काळात अश्या तिन सृत्री कार्यक्रमावर आपल्याला भर द्यावयाचा आहे असा दावा अमित भांगरे यांनी केला.

