पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यात महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून होती.अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शक्यता होणारी चर्चा बंद झाल्या आहे. अमित भांगरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. सध्या तरी अकोले तालुक्यात माजी आमदार वैभवराव पिचड(अपक्ष) आ.डॉ.किरण लहामटे(राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस( शरदचंद्र पवार) यामध्ये प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे.असे असले तरी मधुकरराव तळपाडे,मारुती मेंगाळ,डॉ.अजित नवले,कॉ. तुळशीराम कातोरे हे काय भूमिका घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.या निवडणुकीत वैभवराव पिचड यांची निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे तर आ डॉ.किरण लहामटे यांची निवडणूक ही त्यांनी केलेल्या विकासकामांवर अवलबून आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार साहेब यांच्याशी गद्दारी केल्याने शरद पवार यांनी अकोले मतदार संघात लक्ष घातले असून अमित भांगरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अशा सर्व परिस्थितीत मतदार कोणाला कौल देतात हे 23 नोव्हेंबर ला समजेल.


