पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनीधी)-रोटरी क्लब हे निस्वार्थ भावनेने काम करणारी संस्था असून रोटरीच्या माध्यमातून अकोल्यात डायलिसिस केंद्र सुरू व्हावे या साठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.सत्यजित तांबे यांनी केले.
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने राष्ट्र बांधणीचे शिल्पकार,व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड व साहस गौरव पुरस्कार तसेच पिठाची चक्की, शालेय विद्यार्थ्यांनिंना सायकली वाटप आ.तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आ.सत्यजित तांबे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3132 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.सुरेश साबू, फर्स्ट लेडी सौ निर्मला साबू, असिस्टंट गव्हर्नर विनोद पाटणी, रो . अजित काकडे,जि.प.कृषी व पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती अजय फटांगरे, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे, संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य,डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सुनील नवले,सचिन आवारी, अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.सत्यजित तांबे पुढे म्हणाले की,1926 मध्ये भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत आहे मोठा कार्यक्रम दोन वर्षे साजरा करणार त्यासाठी रोटरीने सहकार्य करावे.
स्वातंत्र्य चळवळीतील तसेच त्या नंतर राष्ट्र उभारणीत संगमनेर अकोल्याचे मोठे योगदान राहिलेले आहे.
रोटरी निस्वार्थ भावनेने काम करणारी संस्था आहे. रोटरी क्लब मध्ये पिताश्री आ. डॉ .सुधीर तांबे, मातोश्री दुर्गाताई तांबे व मी ही इन्ट्रॅक्ट क्लब होतो.मी शिकागो येथे जाऊन आलेलो आहे.अकोले तालुका हा आदिवासी भाग असून आरोग्य,दळणवळण आणि इतर बाबी अडचणी असून डायलीसीस सेन्टर ची अत्यंत गरज आहे.त्यामुळे आपण अकोले रोटरीच्या माध्यमातून एक डायलीसीस सेन्टर सुरू करण्यासाठी योग्य ते सहकार्य करू असे सांगितले.
यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.सुरेश साबू यांनी रोटरी च्या कामाचा आढावा घेतला व प्रत्येक जण हा कोणत्यातरी स्वरूपात सेवा देत असतो.समाजसाठी आपण काहीतरी देण्यामध्ये खूप आनन्द आहे. रोटरी च्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला मदत मिळत दिली जाते.
संकट आल्याशिवाय यश मिळत नाही असे सांगितले.
स्वागत संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले.तर अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी प्रास्ताविक करतांना वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला.व रोटरीच्या माध्यमातून अकोले तालुक्यात डायलिसिस सेन्टर सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.
सूत्रसंचालन साहित्यिक भाऊसाहेब कासार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ . संजय ताकटे यांनी करून दिला तर आभार सेक्रेटरी अमोल देशमुख यांनी मानले.
यावेळी दगडू दशरथ वाकचौरे (जि.प. प्रा. शाळा उंचखडक खुर्द),राजेंद्र वाळू भांगरे (जि.प. प्रा. शाळा कुमशेत),पंडित तानाजी कदम (जि.प. प्रा. शाळा पळसुंदे),सुवर्णा भागवत जाधव-मोहिते (जि.प. प्रा. शाळा, कळस),
सुनील संजय फाळके (जि.प. प्रा. शाळा मुली, राजूर),सुनील पांडुरंग शेळके (कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळदरी),नामदेव रामनाथ कासार (अनुदानित आश्रम शाळा शेंडी),
पोपट सोमा सदगीर (अगस्ति विद्यालय,अकोले),सुधीर एकनाथ जोशी (मॉडर्न हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, अकोले),प्रा.विवेक विष्णू वाकचौरे (अगस्ति महाविद्यालय अकोले),प्रा.संदेश दशरथ कासार (अगस्ति महाविद्यालय अकोले),यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने तर वेल्डिंग क्षेत्रात यशस्वी व कुशल कारागीर म्हणून भानुदास भिकाजी वाकचौरे,अकोले यांना व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड
त्याच प्रमाणे दिव्यांग गिर्यारोहक असलेले व 111 गडकिल्ले सर करणारे केशव किसन भांगरे,अकोले यांना विशेष साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. तीन गरीब महिलांना चक्की वाटप तर मेहेंदुरी विद्यालयातील 5 विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या. रोटरी क्लबमध्ये नव्याने आलेल्या रोटरियंस यांचा रोटरी पीन देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, सहसेक्रेटरी समीर सय्यद, खजिनदार संदीप मोरे,पब्लिक इमेजचे डायरेक्टर हभप दीपक महाराज देशमुख,माजी अध्यक्ष सचिन देशमुख, सचिन शेटे,सचिन आवारी, ,डॉ .रवींद्र डावरे,सुनील नवले, ॲड.बी.जी.वैद्य, प्रा.संजय ताकटे,रोहिदास जाधव,प्रा.संतोष कचरे,विजय पावसे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

