पुण्य वार्ता
संगमनेर ( प्रतिनिधी ) अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात घवघवीत यश मिळवत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.
प्राचार्य सौ.जे.बी.सेटी माहिती देताना म्हणाल्या की, माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे आणि कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने कायम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे यावर्षी 72 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले असून सतरा विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवली आहेत यामध्ये 95.20% गुण मिळवून प्रिया दत्तात्रय लोंढे हीने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर हरीश विनायक गडाख आणि आर्या अजित घुले यांनी 94.40% गुण मिळून द्वितीय व आर्चीत निलेश माळवे यांनी 94% गुण मिळून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
संवाद समन्वय अनुभव आणि उपक्रमशीलता या शाळेच्या विशेष उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मधून दिले जात असून ज्ञानवाढी बरोबरच कौशल्य विकासावर भर देण्याचे काम केले जात आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक व्ही.बी.धुमाळ, डॉ.जे.बी.गुरव प्राचार्य सौ.जे.बी.सेटी यांसह सर्वांनी अभिनंदन केले आहे.

