पुण्य वार्ता
गणोरे प्रतिनिधी (जगन्नाथ आहेर)
आढळा परिसरातील गणोरे ( ता.अकोले ) येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या गणोरे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली झाली असल्याची माहिती गणोरे सोसायटीचे सचिव विवेक आहेर यांनी दिली.
सहकार चळवळीतून गावोगावी सहकारी सोसायट्याची निर्माण झाल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळू लागले आहे. यामुळे शेतकरी समृद्ध झाला आहे.
महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी व शेतीसाठी लागणारा खर्च यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे.या दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमचे प्रमाण वाढत आहे.
आणि निवडणुकीचा मोसम असल्याने सर्वत्र कर्ज माफी होण्या संदर्भात चर्चा असतानाही गणोरे येथील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जात वेळेवर भरणा केला आहे.सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात बॅक पातळीवर ४ कोटी ४५ लाख इतके कर्ज वाटप असुन चालु वर्षात २९ जुन २०२४ अखेर शंभर टक्के वसुली झाली.या कर्जाचा परतावा जिल्हा बॅकेत केला आहे शाखाधिकारी तान्हाजी कोटकर,अमोल पद्मिरे,मनेश कर्पे,प्रमोद आवारी,बाजीराव सहाणे,संजय गायकवाड यांचे वसुली साठी सहकार्य लाभले असे सचिव विवेक आहेर यांनी सांगितले.
संस्थेच जेष्ठ संचालक माजी चेअरमन अशोक ग आहेर म्हणाले संस्थेची स्वमालकिची नविन दुमजली इमारत आहे.संस्थेची वशुली व इतर उत्पन्न यामुळे गणोरे सोसायटीची चांगली भरभराट झाली. मार्गदर्शक अंबादास दातीर,अध्यक्ष सुर्यभान आंबरे, उपाध्यक्ष भाऊपाटील आंबरे, दीपक आंबरे, सूर्यभान भालेराव, भगवान खतोडे, संपत दातीर, लता आहेर, सुमन दातीर, रवींद्र घोसाळे नामदेव पवार, राजेंद्र आंबरे, दिनकर दातीर, अण्णासाहेब आहेर, सचिव विवेक आहेर, राजेंद्र बोराडे, निलेश आंबरे, धोंडीबा दातीर यांनी कर्ज वसुली साठी प्रयत्न केले.

