पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यातील सावरगाव पाट येथील सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते सतिश नेहे यांना साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती मुंबई यांचेकडून दिला जाणारा साने गुरूजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ महर्षी दयानंद महाविद्यालय परळ मुंबई येथे पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु व माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर, कै शिवाजीराव देशमुख सामाजिक शैक्षणिक संस्थाच्या अध्यक्षा चारुशीला देशमुख, समाजभूषण व पोलीस मित्र दिलीप नारद, आरोग्यदूत सुभाषराव गायकवाड, ज्येष्ठ कामगार नेते भाऊ जगताप , सिने अभिनेत्री जयश्री गायकवाड, सिने अभिनेत्री केरॉन टेरी राजा व सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीचे सूरज भोईर व अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांचे हस्ते सतिश नेहे यांना साने गुरूजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
