पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)
५२वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन संपन्न होत असताना ग्रामीण भागात कोणतीही गैरसोय होऊ न देता अतिशय सुयोग नियोजन व उत्कृष्ट व्यवस्थापन आनंदगड शैक्षणिक संकुलात बघावयास मिळाले. प्रदर्शनाला खऱ्या अर्थाने उंची देण्याचे काम या शैक्षणिक संकुला ने केले असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केले ५२व्या विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमातून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव अनिल रहाणे, शिवसेना अहिल्यानगर संपर्कप्रमुख बाजीराव दराडे शिवसेना नेते महेश नवले गटशिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हाळ,शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे ,विज्ञान संघ जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे,गणित संघ जिल्हाध्यक्ष संजय कुमार निक्रड,जिल्हा सचिव धनंजय भांगरे, तालुका अध्यक्ष सतीश काळे ,गणित तालुका अध्यक्ष श्याम मालुंजकर ,सुरेश शिंदे ,मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सुनील धुमाळ,बाळासाहेब मुळे ,सुनील वाकचौरे,गणेश अस्वले, वसंतराव वाकचौरे, दिनेश वाकचौरे , सुप्रिया वाकचौरे, गीता राहणे ,संजय थोरात ,शिवराज वाकचौरे, प्राचार्य किरण चौधरी आदी मान्यवर होते. यावेळी बोलताना श्री कडूस पुढे म्हणाले की आनंदगड शैक्षणिक संकुलात तीन दिवस अतिशय चोख व्यवस्था ठेवण्यात आली कुणाची ही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली संस्थेतील पदाधिकारी ते विद्यार्थी सर्वजण आलेल्या प्रत्येकाची आपुलकीने काळजी घेत होते येथील सोयी सुविधा शहरापेक्षाही सरस होत्या. प्रदर्शन कसे असावे याचे उत्तम उदाहरण या शैक्षणिक संकुला ने घालून दिले आहे त्यामुळे प्रदर्शनाला खऱ्या अर्थाने उंची मिळाली आहे.या प्रदर्शनातूनच उद्याचे वैज्ञानिक घडणार आहेत असे ते पुढे म्हणाले विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या वतीने आयोजकांचे आभार मानले. बाजीराव दराडे यांनी प्रदर्शन किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक योगदानासाठी आनंदगड शैक्षणिक संकुल नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगून त्यासाठीही आदार्य लागते असे मनोगत व्यक्त केले.जिल्हा विज्ञान परीक्षक दत्तात्रय कवळे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सुरेश शिंदे व गट शिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून अनिल राहणे यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी संस्था नेहमीच कटीबद्ध असल्याचे सांगितले भविष्यातही शिक्षण विभागाला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा या संकुलाची दारे नेहमीच खुले राहतील असे अभिवचन दिले.
यावेळी विज्ञान गणित शिक्षक साहित्य व प्रयोगशाळा परिचय साहित्य या गटातून प्रत्येकी तीन बाल वैज्ञानिकांना व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले. याविद्यार्थी स्पर्धकांमधून सहा उपकरणांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली तर शिक्षक व प्रयोगशाळा परिचर गटातून तिघांना राज्यासाठी संधी मिळाली आहे. गटनिहाय निकाल :विज्ञान विभाग प्राथमिक गटात – डोलारे अबीर सागर भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल अहिल्यानगर प्रथम क्रमांक, खैरनार अनिश जितेंद्र न्यू इंग्लिश स्कूल श्रीरामपूर द्वितीय क्रमांक ,शेजवळ अद्वेता नानासाहेब साई गुरुकुल इंग्लिश मीडियम शिर्डी तृतीय क्रमांक ,दिव्यांग गटातून हंगेकर सिद्धेश संतोष स्वामी समर्थ विद्यालय राजुर प्रथम क्रमांक, आदिवासी गटातून आहेर ऋषभ प्रवीण धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल विरगाव प्रथम तर माध्यमिक गटातून भगत अमोल रामदास न्यू इंग्लिश स्कूल सलाबतपुर प्रथम क्रमांक ,समीक्षा चंद्रकांत गट न्यू इंग्लिश स्कूल पारनेर द्वितीय क्रमांक, कर्डिले सुयश अनिल हनुमान विद्यालय टाकळी खतगाव तृतीय , दिव्यांग गटातून पथवे प्रकाश अशोक अढळा विद्यालय देवठाण , देशमुख सिद्धार्थ मच्छिंद्र आदिवासी गट प्रथम. गणित विभाग प्राथमिक गट :आर्या बाळासाहेब आवटे, कालिका स्कूल जामखेड, खरमाटे अनन्या अरविंद त्रिलोक जैन स्कूल पाथर्डी ,दारकुंडे समर्थ राजेंद्र शहर टाकळी हायस्कूल ,दिव्यांग गटातून पराड अनुज बाळू आढळा विद्यालय देवठाण ,गणित माध्यमिक गट – अकोलकर अनुष्का अशोक रेसिडेन्शिअल हायस्कूल अहिल्यानगर ,भुजबळ आर्यन नानासाहेब महात्मा गांधी विद्यालय कर्जत ,पंडित श्रद्धा महेश अगस्ती विद्यालया अकोले यांनी अनुक्रमे एक ते तीन क्रमांक पटकावले. प्राथमिक शिक्षक गटातून गांगर्डे रवींद्र सोपान महात्मा गांधी विद्यालय कर्जत, इंगळे सुनीता भाऊसाहेब नगरपालिका शाळा कोपरगाव,वडीतके बाळासाहेब कारभारी कळस्कर विद्यालय संगमनेर, माध्यमिक शिक्षक गटातून कोल्हे विनायक हरिभाऊ केदारेश्वर विद्यालय पारनेर, किरण प्रकाश मार्कंडेय विद्यालय नगर,धनवडे पांडुरंग किसन काकडे विद्यालय पाटेवाडी ,प्रयोगशाळा परिचर गटातून गोफने ओंकार नामदेव मालपाणी विद्यालय संगमनेर, बापूसाहेब उत्तम आहेर आदर्श विद्यालय गोंधवणी , अरुण वसंत पठारे जिजामाता विद्यालय पारनेर यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले.
कार्यक्रमासाठी बादशहा एखंडे ,संतोष वर्पे ,विजय वाघ, भाऊसाहेब काका वाकचौरे ,अनिल डोळस ,बाळासाहेब आरोटे ,विष्णू मगर सुखदेव नांगरे ,दीपक शिंदे ,चांगदेव खेमनर, विष्णू वाकचौरे ,विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे ,माधव हासे, विनोद नवले ,सचिन वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल फोडसे माया आंब्रे स्वाती वाळे भारती वाकचौरे रोहिणी रेवगडे उज्वला वर्पे, रोहिणी नवले अक्षय नाईकवाडी स्वाती दातखिळे, सौ.खारके, सौ.शेणकर,पोपट दिघे ,लक्ष्मण दिघे श्री.गोडे ,श्रीमती गायकवाड, श्री सावळे, योगिता गोरडे,मयुरी कोल्हे ,ऑरीला सुटिंग, श्रीमती बसिका मॅडम,श्रीमती रिसीका,दीप थापा ,नामदेव सोडणर, गोरक्ष पवार आदींनी परिश्रम घेतले. {} चौकट :अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी अबिर डोलारे ,सिद्धेश हंगेकर ,रिषभ आहेर अमोल भगत ,प्रकाश पथवे ,सिद्धार्थ देशमुख ,आर्या आवटे ,अनुज पराड , अनुष्का अकोलकर हे विद्यार्थी वैज्ञानिक सहभागी होणार आहेत.
