पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य,पर्यावरण क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असून शाळांना विविध मदत करून शिक्षकांना प्रेरणा देणारा आहे असे गौरवदगार जेष्ठ नागरिक तथा मॉडर्न हायस्कूल चे माजी प्राचार्य एस.पी.देशमुख सर यांनी काढले.
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने जि.प.प्रा.शाळा पुलाची वाडी( लोहोटेवाडी) रुंभोडी या शाळेस रुपये २५०००/- किंमतीचा संगणक भेट देण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक तथा माजी प्राचार्य एस.पी.देशमुख सर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, निलेश देशमुख, सुधीर फरगडे,भारत पिंगळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अतुल भाऊसाहेब सावंत, उपाध्यक्ष अमित लक्ष्मण भोत,सदस्य,मुख्याध्यापिका छाया हांडे, उप अध्यापक हेमलता सदगीर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी एस पी देशमुख पुढे म्हणाले की, मी आणि माझी मुले या शाळेतून शिकले,येथील शैक्षणिक दर्जा उत्तम असून अशा शाळांना रोटरी क्लब ने नेहमीच सहकार्य केले आहे.भेट दिलेल्या संगणकाचा विद्यार्थ्यांसाठी निश्चित वापर होईल असे स्पष्ट केले.गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब ने समाजासाठी अतिशय चांगले काम केले असे सांगून रोटरी च्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी रोटरी चे अध्यक्ष माजी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी रोटरी ने वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला,रोटरी मध्ये कार्यरत असताना आपल्या गावासाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून रोटरी चे माजी अध्यक्ष सचिन देशमुख यांनी या शाळेला संगणक मिळावा असा आग्रह धरला होता. रोटरी चे कार्य जगात 200 च्या वर देशात कार्यरत असून याचा एक भाग होण्याचे भाग्य आम्हाला मिळाले व त्यातून आमच्यामध्ये दातृत्वाची भावना निर्माण झाली. रोटरी क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबू यांनी या कामी महत्वाची भूमिका बजावली.असे सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष सचिन देशमुख यांनी प्रास्ताविक केले व रोटरी क्लब ने या शाळेला यापूर्वी कपाट दिलेले असून त्यासाठी लवकरच पुस्तके देण्यात येतील असे सांगितले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत यश संपादन केले अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उप अध्यापक हेमलता सदगीर यांनी
सूत्रसंचालन यांनी करून सर्वांचे आभार मानले.

