पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
अकोले तालुक्यातील नामांकीत पर्यटणस्थळ म्हणून ओळख असलेल्या रंधा येथील रंधा हॉटेल आणि लॉजिंगचे सर्वेसर्वा अरूण लक्ष्मण गोंदके व त्यांच्या सौभाग्यवती शिल्पा अरूण गोंदके यांनी उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणद खुर्द या शाळेतील इयत्ता १ली ते ५वी च्या एकूण ४० विदयार्थ्यांना पंधरा हजार रूपये किंमतीचे स्पोर्ट ड्रेस देणगी स्वरूपात देऊन त्याचे वितरण केले आहे.
याप्रसंगि कामगार पोलीस पाटील शिवराम पटेकर,माजी सरपंच संपत लोहरे, उपक्रमशील शिक्षक विजय कातडे,मुख्याध्यापिका हिरा देशमुख यांसह शिक्षक,विदयार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गोंदके कुटूंबीयांनी दिलेल्या योगदानाबद्दल पालकांकडून तसेच परिसरातून चांगलेच कौतूक होत आहे.पोर्ट ट्रेड परिधान केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता.
यावेळी विजय कातडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांचे आभार मानले.
[गोंदके कुटूंबीयांनी सामाजिक बांधीलकी या नात्याने शालेय विदयार्थ्यांना खेळातून बालकांचा शारिरीक तसेच बौद्धीक व भावनिक विकास व्हावा या दृष्टीने आमच्या शाळेस स्पोर्ट ड्रेसचे केलेले वितरण नक्कीच प्रभावी ठरेल-मुख्याध्यापिका हिरा देशमुख]
