पुण्य वार्ता
कळस (प्रतिनिधी): देव भक्तासाठी अवतार घेतात, देव भक्ताचे संरक्षण करतात तर दुर्जनाचे निर्दलन करतो मात्र संत हे सज्जन आणि दुर्जन या दोघांच्या जीवनाचा उध्दार करतात असे मत अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे यांनी व्यक्त केले.
अमृतवाहिनी प्रवरामातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बु येथे ऋषिपंचमी ते वामन जयंतीपर्यंत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे द्वितीय कीर्तन रुपी पुष्प
संतचरणरज लागतां सहज ।
वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥
जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या संतचरणा ची महती सांगणाऱ्या अभंगावर निरूपण करताना वाकचौरे महाराज बोलते होते.
संत ची माहिती सांगताना प.पू. सुभाष पुरी महाराज यांचे सारखे संत कळस गावाला लाभले अन संपूर्ण गावाचा काया पालट झाला. संत गाडगे बाबा प्रमाणे स्वछता राबवून वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्ती प्रमाणे वृक्ष लागवड व संवर्धनच राष्ट्रीय कार्य केले आहे असेही मत वाकचौरे महाराज यांनी व्यक्त केले.
यावेळी मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे, नितीन महाराज देशमुख गायकवृंद गायनसम्राट अरुण महाराज शिर्के, अनिल महाराज रुपवते, प्रवीण महाराज पांडे, कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे, हार्मोनियम वादक सूर्यकांत ढगे यांनी संगीत साथ दिली. यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे यांनी कीर्तनकार व भोजन पंगत देणाऱ्यांना आंब्याचे झाड भेट देण्यात आले.

