पुण्य वार्ता
अकोले /प्रतिनिधी /तालुक्यातील समर्थ कन्या प्रशाला राजुर येथील मुख्याध्यापक किरण उमाजी भागवत यांना यावर्षीचा अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ यांच्या वतीने जिल्हा गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्याचे वितरण आज 14 /9/ 2024 रोजी शिर्डी येथे साईबाबा कन्या विद्या मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त अहमदनगर जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे यांनी नुकतेच पत्राने कळवले आहे……. राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या चाळीसगाव डांगण ओळख असलेल्या राजूर येथे समर्थ कन्या प्रशालेत मुख्याध्यापक किरण भागवत यांनी आपले अध्यापनाचे कार्य सुरू केले हे कार्य सुरू करत असताना अनेक वर्ष त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर काम केले ध्येय व उद्दिष्ट जिद्द व चिकाटी तत्त्वनिष्ठ ध्येयनिष्ठ असल्यामुळे त्यांनी या भागातील लाखो विद्यार्थ्यांना उभे करण्याचे काम केले माणसातील मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ते आवडते शिक्षक तर पालक वर्गाचे ते लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी वेगळे विश्व निर्माण करत असताना शिक्षणाचे कार्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी समर्थक कन्या प्रशालेत आज जे वटवृक्षात रूपांतर झाले याचे खरे श्रेय या संस्थेत असणारे सर्व कर्मचारी शिक्षक यांचे महत्त्वाचे मानले जात आहे संस्थाचालक व शिक्षक यामध्ये असलेल्या सुसंवाद या जोरावर या शिक्षकांनी उद्याचा आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम केले हे काम करत असताना कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनावर परिणाम होणार नाही त्याला शिक्षणाचे प्रवाहात आणून उद्याच्या आदर्श भारताचे नागरिक आपण आहात व विद्यालयाची गुणवत्ता त्यांनी पुढे नेत असताना त्यांनी जो संकल्प केला आज तो त्यांच्या हिंदी अध्यापक दिनाच्या दिवशी त्यांना जो पुरस्कार देऊन सन्मान होईल तो नक्कीच त्यांना भविष्यकाळात त्यांच्यावर शाबासकीची थाप असेल त्यामुळे वडील शिक्षक एक सुसंस्कृत कुटुंब नेहमी प्रत्येकाला उभारी देणारे प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होऊन प्रत्येकाला अडीअडचणीच्या काळात साथ देणारा भागवत परिवारातील किरण उमाजी भागवत हे एक वेगळ्या प्रकारचे नाव आजही सगळ्या क्षेत्रात वेगळेपण निर्माण केले आहे शेवटी म्हणतात परमेश्वर प्रत्येकाला सुसंस्कृत जीवन देत असतो उंच भरारी त्याचप्रमाणे उच्च विचारसरणी मनी असल्यामुळे सिने अभिनेता अभिताभ बच्चन यांना परमेश्वराने जशी उंची दिली विचार दिले आणि समाजात जी त्यांना किंमत प्राप्त झाली ती पुनरावृत्ती किरण उमाजी भागवत यांच्या रूपाने नक्कीच पाहावयास मिळते एकदम शिस्तप्रिय एकदम मनमिळावू एकदम वर्गात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थी आपल्या नजरेतूनच काही क्षणातच शांतमय वातावरण करणारे शिक्षणाचे फवारे फुलविणारे असे ते व्यक्तिमत्व आणि खरंच या व्यक्तिमत्त्वाला जो आज पुरस्कार देऊन जो सन्मान होईल तो नक्कीच जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील शिक्षकांना एक प्रेरणादायी ठरेल अशी चर्चा शिक्षक वर्गांमधून व्यक्त होत आहे या संस्थेचे मवेशी राजुर येथील सर्व शिक्षक एक होवून जीव ओतून काम करत आहेत…. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त प्राचार्य प्रकाश टाकळकर. सेवानिवृत्त उप अभियंता आर डी आरोटे डॉक्टर अतुल आरोटे. प्रा जे डी आरोटे.अकोले महाविद्यालयाचे प्राध्यापक नितीन आरोटे. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब आरोटे.अहमदनगर जिल्हा शिक्षक व शिक्षक तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल .स्वामी समर्थ कन्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास महाले .प्रकाश महाले. विनायक साळवे. सतीश काळे . अकोले पंचायत समितीचे अधिकारी सुनील मोहटे .चितळवेढे ग्रामपंचायतचे उपसरपंच नवनाथ गोविंद आरोटे .कैलास गणपत आरोटे…. या सर्व सरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
