पुण्य वार्ता
अकोले(प्रतिनिधी) तालुक्यातील वीरगाव येथील आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्यू ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आनंदगड शैक्षणिक संकुलात वर्धापन दिन व कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या शनिवारी सकाळी दहा वाजता माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह आ सत्यजीत दादा तांबे ,माजी आ वैभवराव पिचड, संजीवनी चे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, लिज्जत पापड चे कार्य.संचालक सुरेशराव कोते , शिर्डी संस्थान चे विश्वस्त डॉ.जालिंदर भोर, अगस्ती चे अध्यक्ष सीताराम गायकर, आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त संतोष ठुबे,मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे,सिने दिग्दर्शक सुधीर पठाडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी दिली.
या कार्यक्रमात संस्था उभारणी पासून ज्या घटकांचे योगदान लाभले तो सर्व मित्र परिवार, नागरिक, शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून सर्वाँना आमंत्रित करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती सचिव डॉ अनिल रहाणे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी मधुकरराव नवले, शिवाजीराजे धुमाळ,प्रांताधिकारी डॉ शैलेश हिंगे,प्रकल्प अधिकारी राजन पाटील,तहसीलदार सिद्धार्थ मोरे,पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, भाऊपाटील नवले, विठ्ठलराव चासकर, कैलासराव वाकचौरे ,आर.बी शेठ रहाणे,शांताराम कढणे, कार्य अभियंता वर्पे साहेब, बी जे देशमुख साहेब, दशरथ सावंत साहेब,गिरजाजी जाधव, सुनील दातीर साहेब,राजेंद्र देसाई, गटविकास अधिकारी विकास चौरे, गटशिक्षणाधिकारी अभय वाव्हळ,यशवंतराव आभाळे, डॉ विश्वासराव आरोटे, अमोल वैद्य,अशोक उगले,बाळासाहेब वडजे, दत्तात्रय वाणी, प्रा विद्याचंद्र सातपुते आदि उपस्थित राहणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य किरण चौधरी, प्राचार्या पल्लवी फलके, संदीप थोरात, शिवराज वाकचौरे, रविंद्र आंबरे, दिनेश वाकचौरे यांनी केले आहे.

