पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील लिंगदेव बीट अंतर्गत असलेल्या तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परीषद चाँदसुरज शाळेला उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले आहे. बालचिमुरड्यांचे कृषी विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेतचे मुख्याध्यापक श्री.भांगरे सर व श्रीम.घुले मॅडम यांनी अपार मेहनतीने परसबाग तयार केलीआहे , विशेष म्हणजे एक वर्षाच्या आत विविध प्रकारची औषधी वनस्पती तसेच पोषण तत्त्व असणाऱ्या शेंग भाज्य, फळभाज्या यात समावेश आहे. हे सर्व सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे आरोग्यास उत्तम अशा पालेभाज्यांचा समावेश पोषण आहारात केला जातो. शेवगा, हादगा, सिताफळ,केळी, कढीपत्ता, भोपळा, गवती चहा, आंबा, पेरू, पपई इत्यादी समावेश आहे यासाठी शाळेची व्यवस्थापन कमिटी तसेच उल्लेखनीय लोकसहभाग चास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य या सर्वांचा मोलाचा वाटा आहे, गेल्या वर्षीच शाळेतील शिक्षकांना, “आधार फाउंडेशन” या संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे त्याचबरोबर सन 23 – 24 मध्ये मिपा अंतर्गत “शिक्षणातील दीपस्तंभ ” या मासिकात यशोगाथेसाठी चांदसुरज शाळेची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.या कामी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हळ साहेब, शालेय पोषण अधीक्षक कुमावत साहेब, विस्ताराधिकारी ठुबे साहेब, केंद्रप्रमुख बडे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात शाळेचा चढता आलेख आदर्श शाळा बनवण्याकडे असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.


