पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
अकोले तालुक्यातील जायनावाडी एकदरे येथे पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पेसा दिन साजरा करू,ग्रामसभेचे हक्क मजबूत करू,पेसा लागु विकास लागु,आशा घोषणा देत जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा जायनावाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकदरे येथील शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी सहभाग घेऊन गावातून पेसा विषयक प्रभात फेरी काढून जन जागृती केली.पेसा कायदा २४ डिसेंबर १९९६ रोजी अस्तित्वात आला. हा कायदा अंतर्गत देशातील एकूण १० राज्यांमध्ये याचा समावेश करण्यात आला. हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांची संबंधित असून आदिवासींची संस्कृती प्रथा परंपरा यांचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची सुशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे.असे बोलताना काळू भांगरे यांनी सांगितले.या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेत अनुसूचित क्षेत्र बाहेर ग्रामसभेपेक्षा ग्रामपंचायत अधिनियम १९५८याचे विशेष अधिकार देण्यात आले.
यावेळी उपस्थित जायनावाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ गोडे,काळू भांगरे,ग्रामपंचायतचे कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी व महिला ग्रामस्थ तसेच एकदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब मुठे,ग्रामविकास अधिकारी युवराज वायळ,एकदरे ग्रामपंचायत उपसरपंच लिलाबाई भांगरे,नानासाहेब भांगरे,रंगुबाई लोटे,लालू साबळे,लक्ष्मण कोरडे,ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व ग्रामस्थ अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

