पुण्य वार्ता
संपादक
खरंतर आमची अवघ्या चार-पाच वर्षाची मैत्री. पण, जेव्हा विकासराव सानिध्यात आले तेव्हापासून त्यांच्या सर्वव्यापी स्वभावाने मला सदैव आपुलकी वाटली आहे. आदर्श तरुण कसा असावा तर विकासभाऊ यांच्यासारखा. जेव्हा गाव हाती घेतले तेव्हा त्यांनी एक आदर्श गाव कसे असावे याचे उत्तम उदा. महाराष्ट्रासमोर ठेवले. नंतर शाळा हाती घेतली तर आज देखील एक आदर्श शाळा म्हणून ढोकरीकडे पाहिले जाते. “विकास” फक्त नावात नाही तर कृतीत देखील आहे हे त्यांनी सिद्ध केले. काहीतरी करण्याची जिद्द उरी बाळगून त्यांनी राजकारण, समाजकारण, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात लक्ष घातले होेते. आज ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या स्वराज्याचा वचननामा होता. की, “सर्वांस पोटास लावणे आहे” मावळा म्हणून विकासराव त्यास सार्थ ठरले. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या आयुष्याच्या परिघावर दिसतात. नि:स्वार्थ मैत्री आणि मदत करण्याची त्यांची वृत्ती आम्ही फार जवळून पाहिली आहे. “पुरोगामी विचारांचे वारसदार” म्हणून त्यांनी सदैव वैचारिक शक्तीला बळ दिले आहे. राजकारण आणि समाजकारण करताना आयुष्यात प्लस मायनस होत असते. पण, तरी देखील वैयक्तीक तोटा झाला तरी बेहत्तर, पण सामाजिक शहाणपण त्यांनी कायम जपले आहे. अनेक गरिब मुलांना शैक्षणिक मदत करताना आम्ही विकासराव पाहिले तर काही हताश झालेल्या कुटुंबांना सावरताना आम्ही त्यांना पाहिले आहे. कधी गरजू व्यक्तींच्या दवाखान्याची बिले भरताना आम्हाला विकासराव दिसले तर कधी झोपडीत जेवताना आम्ही विकासराव पाहिले. इतके नितळ, निर्मळ आणि प्रांजळ स्वभावाचे हे व्यक्तीमत्व कधीच कोणाच्या दुखण्यावर ससले नाही आणि सलणार नाही असा त्यांचा स्वभाव मी जवळून पाहिला आहे.
खरंतर कुटुंब व्यवस्था कशी असावी याचे उत्तम उदा. तालुक्यात फार कमी ठिकाणी पहायला मिळते. त्यात मधुभाऊ नवले किंवा भाऊमामा खरात अशी काही उदा. असतील. त्यात आमचे कचरु पाटील शेटे (दादा) यांचे नाव देखील अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. आज देखील एकत्र कुटुंब पद्धत कायम असून घरात सर्व व्यक्ती स्वयंभू आहेत. एक मुलगा क्लासवन अधिकारी आहे, एक संपुर्ण शेती पाहतात, एक श्रीराज ट्रेडिंगचा व्यवसाय पाहतात तर विकासराव सर्व क्षेत्रात पारंगत आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबातील दोन मुले बाहेर देशात आहेत, काही नोकरीत आणि काही व्यवसायात आहे. पण, काडीमात्र व्यसन कोणाला नाही. अपसूक घरात कोणी ज्येष्ठ मानसे आली तर मान झुकवून आशिर्वाद घ्यायला त्यांना कोणता कमीपणा वाटत नाही. मग तो अमेरिकेत असो वा रशियात शिकत असूदे. हा संस्कार शेटे कुटुंबाने जपला आहे.
आज विकासभाऊ घरातील लहान व्यक्ती आहे. पण, तरी देखील कुटुंबातील अनेक महत्वाची काम त्यांच्या हाती आहेत. घरात अन्य मोठी तथा क्लासवन अधिकरी असून देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा बघ की लहान व्यक्तींना ते मार्गदर्शन करुन सर्व निर्णय एकोप्याने घेतात आणि स्विकारतात. ही अशी कुटुंब व्यवस्था या भारताला अपेक्षित आहे. आमचे दादा कचरु पा. शेटे यांचे वर आता 70 पार झाले आहे. पण, आज देखील घरातील कमविणारी प्रत्येक व्यक्ती त्यांचा पगार दादांच्या हातात आणून देते. होय.! अगदी महिला सुद्धा. इतके वय होऊन सुद्धा दादा रोज आपली दैनंदिनी डायरी लिहीतात, सगळी मुले, मुली, नातवडे, पाहूणे, नातेवाईक यांच्याशी सलोखा ठेवून संपुर्ण कुटुंब त्यांनी आजवर एकसंघ ठेवले आहे. खरंतर आज विकासभाऊ यांचा वाढदिवस असला तरी त्यांच्या कुटुंबातील आईसह पत्नी आणि महिला, पुरुष, मुले या सर्वांचे कौतुक केले पाहिजे. कारण, शेटे परिवाराचा वारसा आणि संस्कार व संस्कृती टिकविण्यासाठी या प्रत्येकाने खारीचा वाटा उचलुन हा वारसा कायम ठेवला आहे.
विकासभाऊ 47 व्या वर्षात पदार्पन करत आहेत. ते पहिल्यापासून शरद पवार साहेबांना फॉलो करतात. त्यामुळे मला खात्री आहे. की, त्यांच्यासाठी वयाचे आकडे हे शुल्लक असणार आहे. त्यांच्या कर्तुत्वाचे आकडे भविष्यात देखील सर्वव्यापी असणार आहे. आई तुळजा भवानी त्यांना निरोगी व वैभवसंपन्न आयुष्य देवो हीच ईश्वराकडे प्रार्थना. जेव्हा त्यांची स्वप्न अपुरी असेल तेव्हा देव माझे श्वास त्यांना देवो ही इच्छा. असा मित्र लाभला म्हणून देवा तुझे कोटी कोटी आभार.!!
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
- – ॲड. सागर शिंदे
सार्वभौम परिवार, अकोले

