पुन्य वार्ता
गणोरे – प्रतिनिधी
जगन्नाथ आहेर
पिंपळगांव निपाणी (ता.अकोले) येथील सुपार्या डोंगराच्या पायथ्याशी आपल्या झोपडी समोर लगवीसाठी बसलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरडा झाल्याने बिबट्या पळुन गेला. मुलगी बालंम बाल वाचली.
आढळा परिसरातील विरगाव, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव आंबरे, गणोरे, देवठाण डोंगरगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर सुरूच असुन बिबटे आक्रमक होत आहेत.आता ते पशुधना बरोबरच माणसांवरही हल्ला करू लागले आहेत.
गुरुवारी सकाळी सहा वाजता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ( बाजरी सोंगणी च्या कामासाठी ) करण्यासाठी नामदेव भुतांबरे आपल्या परिवारासह पिंपळगाव निपाणी येथील सुपार माळा जवळील खंडोबा मंदिराच्या बाजूला पिंपळगाव निपाणी शिवारात त्यांच्यासोबत इतर आठ नऊ कुटुंब ही छोट्या झोपड्या करून राहत आहेत. गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता प्रातर्विधीसाठी कु.जयश्री नामदेव भुताबंरे (वय ८ ) ही बाहेर लगवी साठी गेली असता बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न. घरातील सगळेच बाहेर असल्यामुळे बिबट्याचा अंदाज लक्षात आल्याने जयश्री चा मामा किरण खोडके व इतरांनी आरडा ओरडा करून बिबट्याला पळवून लावले. या मुलीला किरकोळ जखमा झाल्या आहेत.. केवळ दैव बलवत्तर म्हणुन मुलीचे प्राण वाचले.
बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मुलीचा मामा किरण खोडके, अजय उघडे, गोरक्ष उघडे यांनी मदत केली..
वनविभागाचे अधिकारी पंकज देवरे यांना या घटनेचे माहिती कळताच त्यांनी तातडीने वनविभागाचे कर्मचारी तेथे पाठवले व पिंजऱ्याची व्यवस्था केली. काही दिवसापूर्वीच वीरगाव येथील दोन बस्तीराम गांगड व पोपट देशमुख यांच्यावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. संदीप वाकचौरे व सार्थक वाकचौरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बस्तीराम गांगड हे उपचार घेऊन घरी आले आहेत तर माधव पोपट देशमुख अजुन ही उपचार घेत आहेत.
बिबट्याच्या हल्यापासून वाचण्या साठी परिसरात मार्गदर्शन.
—–
आढळा परिसरात बिबट्याचे माणवावर वाढते हल्ले यामुळे बिबट्यांची दहशत वाढली आहे.यासाठी बिबट्याच्या हल्ल्यापासून विरगाव, गणोरे, देवठाण, पिंपळगाव निपाणी या ठिकाणी वन विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. गणोरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नाशिक येथील मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले बिबट्यांचा वावर गावाच्या जवळ वाढला आहे.कारण त्याचे मुख्य अन्न गावातील भटके कुत्रे व लहान जनावरे आहे. गावात, शेतात चुकून बिबट्या समोर आला तर आपण खाली वाकायचे नाही. हात वर करुन हळु हळु मागे चालायचे. त्याची कोणत्याही प्रकारची खोड करायची नाही. त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा नाही. बिबट्याचे पिल्ले असतील तर त्या परिसरात जायचं नाही. सेल्फी काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. घराबाहेर लख्ख लाईट लावावी. मुलांनी रात्री घराबाहेर पडू नये, उघड्यावर सौच्यास जाऊ नका. बिबट्या आपल्या पेक्षा उंच असलेल्या प्राण्याला घाबरतो.तो खाली बसलेल्या अथवा वाकलेल्या माणसावरच हल्ला करत असतो. त्याला मोठा आवाज सहन होत नाही. यामुळे बिबट्याला पळुन लावण्यासाठी फटाके वाजवले जातात. या प्रकारे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात माहिती सागितले. यावेळी पंकज देवरे, एकनाथ पारेकर,बाळासाहेब थोरात,शुभम आंबरे,सुशांत आरोटे,मुख्याध्यापक एस के कऱ्हाळे,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———

गणोरे – येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात बिबट्या हल्ल्तापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वन्यजिव संरक्षक वैभव भोगले.
