पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी (सचिन लगड)-
अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शासनाच्या आदेशानुसार २४ डिसेंबरला पेसा कायद्याला २८ वर्षे पूर्ण झाले.त्या अनुषंगाने पेसा दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारंघुशी येथे साजरा करण्यात आला.पेसा कायदा १९९६ व सामूहिक वनहक्क कायदा २००६ माहिती व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती,प्रथा परंपरा,आपला अभिमान यांचे जतन व संवर्धन करा असा संदेश सांस्कृतिक कार्यक्रमांतून देण्यात आला.ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची सुशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे.या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेत अनुसूचित क्षेत्र बाहेर ग्रामसभेपेक्षा ग्रामपंचायत अधिनियम १९५८ याचे विशेष अधिकार देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हिरामण गभाले,ग्रामपंचायत सरपंच फसाबाई बांडे,शाळेतील मुख्याध्यापक व त्यांचे सर्व कर्मचारी,पेसा अध्यक्ष तुकाराम कडाळी, सदस्य प्रकाश कोरडे,सामाजिक कार्यकर्ते अजित कडाळी,अंगणवाडी सेविका मंदा गभाले,रतन गोडे,अनिकेत भागडे,बहिरू गभाले,शांताराम भागडे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

