पुन्य वार्ता
लिंगदेव (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील लिंगेश्वर आदर्श विद्यालय वार्षिक पारितोषिक वितरण व डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन थाटामाटा पार पडले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशनचे प्रमुख माननीय नरेशजी सुराणा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्नल मलिकार्जुन नवलगट्टी यांनी भूषविले
जम्मू काश्मीर या ठिकाणी कर्नल पदावर कार्यरत असणारे माननीय नवलगट्टी साहेबांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले ट्रेसेबल गिविंग फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग क्लासरूम प्रोजेक्टर भेट देण्यात आला. सदर डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व सैनिक नृत्य सादर केली. या कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तालुका स्तरावर व राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळवले त्यांचा सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
तसेच रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी.प्रजासत्ताक दिन विद्यालयात संपन्न झाला. विद्यालयाचे ध्वजारोहण व ध्वज पूजनाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष भास्करराव फापाळे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघाचे सचिव व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे व लिंगदेव गावचे ग्रामविकास अधिकारी माननीय राजेंद्र पावसे साहेब यांच्या हस्ते पार पडले . ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या माता पिता पालन पूजन कार्यक्रम संपन्न झाला . विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांचे व मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी पूजन केले. यावेळी विद्यालयात आलेल्या पालकांचा सन्मान. ट्रिसिबल गिविंग फाउंडेशनचे सदस्य अजित तावरे यांनी केले. या दिवशी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम ही संपन्न झाला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे व त्यांच्या सौभाग्यवती सौ कल्पनाताई फापाळे ग्रामपंचायत सदस्य ह्या होत्या. शैक्षणिक कार्यात कला- क्रीडा विज्ञान विभागात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक श्री लांडगे सर यांनी केले. विद्यार्थी माता पिता पालक पूजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपीनाथ हाडवळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री घुले सर यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व माजी मुख्याध्यापक कदम गुरुजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊ कानवडे साहेब , लिंगेश्वर ज्ञानगंगा वाचनालय अध्यक्ष सदाशिव कानवडे गुरुजी, जाधव सर, लहीत गावचे पालक जयराम बोराडे सचिन आंबरे, पोपट उघडे ,मच्छिंद्र चौधरी ,कैलास कदम ,सुनिता चौधरी ,ज्योती आढाव भाऊसाहेब चौधरी, ऋषिकेश कानडे राधाकिसन फापाळे, उल्हास फापाळे दिलीप काळे गणेश कानवडे बबन कोरडे, उत्तम ढगे ,लालू गांडाळ ,दादाभाऊ दुर्गुडे , अनिता ढगे आदी पालक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

