पुण्य वार्ता
शिर्डी ( प्रतिनिधी ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर नगर जिल्हा संघटकपदी शिर्डी येथील गणेश साळवे यांची निवड करण्यात आली.
राहता येथे रिपाई कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी साळवे यांच्या निवडीची घोषणा केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले व राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या वर निष्ठा ठेवत साळवे यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विजयरावं वाकचौरे, राज्याचे नेते बाळासाहेब गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, उत्तर महाराष्ट्र संघटक रमेश शिरकांडे, राहता तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेश साळवे यांचे अकोले मूळ गाव असून व्यवसाया च्या निमित्ताने शिर्डी येथे वास्तव्य आहे. युवकामध्ये त्यांचे संघटन आहे. त्यांचे नेतृत्व कौशल्य पाहून जिल्हा कार्यकारणी मध्ये संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
भविष्यकाळात रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे गणेश साळवे यांनी सांगितले . यावेळी अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यांच्या या निवडीचे ना. रामदास आठवले, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी अभिनंदन केले.
