पुन्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
आमदार सत्यजित दादा यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले शिवनेरीवर महाश्रमदान.
२७ सप्टेंबर २०२४ रोजी दहा हजार मावळ्यांनी गड किल्ले स्वच्छता व श्रमदानाचा केला महासंकल्प ठिकाण शिवनेरी जुन्नर
संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून राज्यातील गड किल्ले संविधान संवर्धनासाठी महाराष्ट्राचे तरुणांचे आयकॉन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार 27 सप्टेंबर रोजी शिवनेरी वर राज्यातील हजारो तरुणांनी स्वच्छता व महाश्रमदान केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत गड किल्ल्यांचे अत्यंत मोठे महत्त्व राहिले आहे .खऱ्या अर्थाने महाराजांची स्मारक हे सर्व गड किल्ले असून ते पुढील पिढ्यान करता सदैव प्रेरणादायी ठरावे या करता सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे ,याकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यातील हजारो युवक स्वच्छता व महाश्रमदानाचा संकल्प करण्यात आला.
शुक्रवार 27 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले किल्ले शिवनेरीवर सकाळी दहा वाजता पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे राज्यातील दहा हजारांहून अधिक युवक मावळ्यांसह पोहोचले व त्यांनी तेथे साफसफाई केली व वृक्षारोपण केले तसेच यानंतर सर्व आलेल्या तरुण मावळ्यांनी सर्व गड किल्ले संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी शपथ घेतली
हा अभिनव उपक्रम नक्की सर्वांसाठी प्रेरणादायी असून या महास्वच्छता व श्रमदान अभियानात यशस्वी करण्यात जय हिंद लोक चळवळ, आमदार सत्यजित दादा मित्र मंडळ, संगमनेर औद्योगिक वसाहत मित्र मंडळ यांनी खूप परिश्रम घेतले. हा सर्व कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर यांचे चेअरमन श्री सत्यशील दादा शेरकर यांचा सिंहाचा वाटा राहिला.


