पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगाव अकोले या महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांचे मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड या नामांकित कंपनीच्या मुलाखतीमध्ये निवड झालेली आहे. या मुलाखतीसाठी अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी मातोश्री राधा फार्मसी कॉलेज विरगाव या महाविद्यालयातील बी फार्मसी चतुर्थ वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोकरी करिता निवड झाल्याचे पत्र कंपनीकडून नुकतेच प्राप्त झाले असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच नोकरी मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. गायत्री भोर, साक्षी आंबरे, श्रद्धा शिंदे, आदित्य पन्हाळकर, जिनेन्द्र जैन, जय पांडे, अनिकेत गडाख, रवींद्र आनंदे, स्वप्निल एखंडे, अखिलेश गोरे, रविदत्त गोफणे, ओमकार आगरे, प्रतीक कडणे व आकाश पाटील या सर्व विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. प्राचार्या डॉ पल्लवी फलके कोटकर यांनी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यामुळे त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे सर , सचिव डॉ.अनिल रहाणे सर , गीता रहाणे मॅडम , सुप्रिया वाकचौरे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

