पुण्य वार्ता
प्रतिनिधी ( दत्तू जाधव):-अकोले तालुक्यातील शेरणखेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २७ डिसेंबर रोजी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गावचे सरपंच दिपक पथवे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कासार, समीती सदस्य प्रा गणेश कोकणे यांच्या शुभहस्ते या क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये कबड्डी, खोखो, गोळा फेक, उंच उडी, लांब ऊडी, थाळी फेक अशा विविध खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ,राजूर बीटच्या विस्तार अधिकारी सविता कचरे,केंद्र प्रमुख देवेंद्र अंबेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी केंद्रातील शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


