पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील मूळ रहिवासी असलेले धोंडीभाऊ शंकर हांडे यांचा मुलगा श्री दिलीप धोंडिभाऊ हांडे यांची नवीदिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली.
श्री हांडे हे केंद्र सरकारच्या अख्यातरीत येणाऱ्या पॅरा मिलिटरी मध्ये प्रधान आरक्षक( पोलीस हवालदार)म्हणून पुणे येथे भरती झाले. त्यांनतर प्रशिक्षण साठी 1996 मध्ये त्यांची बदली मध्यप्रदेश येथील बडवा येथे झाली,त्यानंतर
1997 मध्ये राजस्थान मधील जयपूर येथे बदली झाली,त्यांनंतर सन 2000 मध्ये त्यांची बदली जम्मू काश्मीर येथे झाली.त्यानंतर मध्यप्रदेश मधील देवास येथे बदली झाली.त्यानंतर सन 2007 मध्ये मुंबई पोलीस मध्ये त्यांनी काम केले.त्यानंतर सन 2010 मध्ये छत्तीसगड येथिल बिलासपूर येथे काम केले.सन 2014 मध्ये गुजरात मध्ये बडोदा येथे बदली झाली.त्यानंतर 2018 मध्ये दिल्ली येथे लाल किल्ला येथे हवालदार (प्रधान आरक्षक) म्हणून रुजू झाले.
त्यांनतर दि.15 एप्रिल रोजी त्यांना पदोन्नती मिळून ते सहाय्यक पोलीस उप निरीक्षक या पदावर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे रुजू झाले.
त्यांच्या या पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
