पुन्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत डोंगरगावच्या शिवतेजने मिळविले नेत्रदीपक यश मिळवले आहे.
शिवतेज अस्मिता प्रदीप उगले या विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत २६८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक मिळवला तसेच मागील वर्षी शिवतेज इस्त्रो सहलसाठी पात्र होऊन केरळ थुंबा येथे वैज्ञानिक सहलीला जाऊन आला. शिवतेजने मिशन आरंभ, मंथन प्रज्ञाशोध, लक्षवेध परीक्षा अशा विविध स्पर्धेत सहभाग घेऊन राज्य पातळीपर्यंत यश मिळवलेले आहे. या प्रतिभावान विद्यार्थ्याचे अकोले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद जी कुमावत साहेब, देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जी गायकवाड साहेब, गणोरे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनीलजी घुले साहेब तसेच शिक्षक वृंद, ग्रामस्थ डोंगरगाव हिवरगाव, पिंपळगाव निपाणी तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


