पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या अनुशंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निर्धार बैठकीचे आयोजन आज अकोले येथे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या मार्गदर्शाना खाली जेष्ठ नेते वसंतराव उघडे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली.
महायुक्तीने आम्हाला आज पर्यत विश्वासात घेतले नाही व सत्तेत सहभागी करुन घेतले नाही त्यामुळे आम्ही गावो गावी जाऊन लोकांशी चर्चा करुन ठरवू की कोणाबरोबर जायचे तसेच पण
महायुती बरोबर आम्ही जाणार नाही असा निर्घार आम्ही आज या बैठकीतुन घेत आहे.
येत्या 9 तारखेला मोळावा घेऊन आपण जाहिर करु कोणाबरोबर जायचं आम्ही ज्याच्या बरोबर जाऊ तो उमेदवार विजयी होणार महायुती च्या उमेदवाराच आम्ही काम करणार नाही असे मत प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी मांडले.
या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष राजेंद्र गवांदे, महाराष्ट्र राज्य संघटक रमेशराव शिरकांडे ,संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके युवक अध्यक्ष विजय पवार, तालुका कार्याध्यक्ष किशोर शिंदे,कमलेश कसबे,गणेश साळवे, पठार विभागाचे नेते विजय खरात, रविंद्र डोंगरे, सिद्धार्थ खरात, विठ्ठल खरात, ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब वैराट, जिल्हा संघटक विजय अडांगळे, शहराध्यक्ष विशाल वैराट, संगिता साळवे, रंजना पराड, त्रिम्बक पराड, राजेंद्र आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष सावळेराम गायकवाड, ,प्रल्हाद माळी, रवींद्र देठे, तालुका उपाध्यक्ष रमेश वाकचौरे, कैलास संगारे, आनंद संगारे, प्रमोद गायकवाड, अक्षय पवार, शंकर संगारे, रवी येडे,शंकर वायाळ, दिपक पवार, आदि कार्यकर्ते उपस्थिती होते.

