पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
216 (अ. ज.)अकोले विधानसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 चे मतदार संघाचे उमेदवार निहाय खर्च ताळमेळाचे अंतीमिकरण करण्याचा अंतीम चौथा टप्पा अहिल्यानगर चे जिल्हाधीकारी सिद्धराम सालीमठ व पश्चिम बंगाल हुन आलेले केंद्रीय खर्च निरीक्षक देबाशिस बिस्वास यांचे समक्ष आज रोजी दिनांक 19/ 12/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे संपन्न झाला.
या प्रसंगी त्यांचे स्वागत जिल्हा खर्च व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांनी केले.यावेळी पश्चिम बंगाल हुन आलेले केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. देबाशिस बिस्वास म्हणाले की, मी आता पर्यंत अनेक निवडणुकांचे काम केले.परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुभव अतिशय चांगला असून येथे सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली .यामध्ये सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, खर्च निरीक्षक टीमचे सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी अतिशय चांगले काम केले व सहकार्य केले.त्या सर्वांचे अभिनंदन करतो.माझ्याकडे असलेल्या अकोले,संगमनेर, कोपरगाव,राहाता तालुक्यातील सर्वांनी अतिशय चांगले सहकार्य केले.त्यामध्ये अकोले तालुक्यातील निवडणुक खर्च विषयक कामकाज उत्तम झाल्याचे गौरवदगार त्यांनी आवर्जून काढले.तसेच अकोले तालुका हा हेल्दी तालुका असून मला आवडलेला असून या तालुक्याने मला भुरळ पाडली असाही श्री. बिस्वास यांनी आवर्जून उल्लेख केला.
यावेळी आ.डॉ.किरण लहामटे यांचे प्रतिनिधी अक्षय आभाळे, दत्तात्रय शेलार, खंडू आवारी, माजी आमदार वैभवराव पिचड यांचे उमेदवार प्रतिनिधी
यशवंतराव आभाळे, प्रा.विद्याचंद्र सातपुते, अमित भांगरे यांचे प्रतिनिधी धनंजय झोळेकर,सुनील पानसरे,अशोक आवारी, मधुकरराव तळपाडे यांचे प्रतिनिधी दत्तात्रय शेणकर,मारुती मेंगाळ यांचे प्रतिनिधी दीपक कासार,उमेदवार विलास घोडे, पांडुरंग पथवे आदी उपस्थित होते.
या निवडणूक खर्च प्रक्रियेत मध्ये निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ सिद्धार्थ मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, मुख्य लेखाधिकारी श्री.धस,श्री रोकडे सहायक खर्च निरीक्षक श्री.रोकडे, नोडल अधिकारी (खर्च) के.टी. पिसे व खर्च पथकातील संतोष ठाणेकर, रवींद्र आभाळे, हिम्मत सावळे, श्री.पाबळकर,श्री.आंबेकर, श्री.रणमाळे,
अजित शिंदे यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचेशी उत्तम संवाद ठेवून निवडणूक खर्च प्रक्रिया उत्तम रित्या पार पाडली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विद्याचंद्र सातपुते यांनी आभार मानले.

