पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड )-
असाध्य ते साध्य करिता सायास,कारण अभ्यास तुका म्हणे.या संतश्रेष्ठ तुकारामांच्या अभंगाप्रमाणे कठीण,अशक्य असे काहीच नाही.प्रयत्न,सराव,मेहनतिने एखादी गोष्ट मिळवता येते.जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.याप्रमाणे राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाने क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवत गगन भरारी घेतली आहे.
दा.ह.घाडगे पाटील विदयालय नेवासा फाटा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत खेळाडूंची विभागीयस्तरावर निवड झाली आहे.
या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांमध्ये ५० किलो वजन गटात लोहरे निलेश, ४५ किलो वजन गटात बोऱ्हाडे जयेश तर मुलींमध्ये ४४ किलो वजन गटात जाधव ईश्वरी आदींनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर ३६ किलो वजन गटात धोंगडे कार्तिकी हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.तसेच १९ वर्षाखालील मुले ५० किलो वजन गटात मुतडक सुरज व मुलींमध्ये ४८ किलो वजन गटात कोंडार पुजा यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.या सर्व खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे.
याप्रमाणेच तालुकास्तरावर कबड्डी मध्ये मुलींचा संघ १७ वर्षे वयोगटात सेमी फायनल पर्यंत पोहचला तर १४ वर्षे वयोगटाचा संघ उपविजेता ठरला.
तसेच क्रिकेटमध्ये १९ वर्षे मुलांच्या टिमने द्वितीय क्रमांक मिळविला असून सदर संघ उपविजेता ठरला आहे.
या गुणवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच तान्हाजी नरके, क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे, विनोद तारू यांचे मार्गदर्शन लाभले.
या उत्तुंग यशाबद्दल खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल.मुठे,माजी सचिव टी.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,एस.टी.येलमामे,विलास पाबळकर,विजय पवार, श्रीराम पन्हाळे,अशोक मिस्त्री यांसह सर्व संचालक,शिक्षण निरिक्षक लहानू पर्बत,प्राचार्य बादशहा ताजणे,उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी,माजी प्राचार्य मनोहर लेंडे, अंतुराम सावंत,प्राचार्य भाऊसाहेब बनकर, मधुकर मोखरे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
[आत्मविश्वास हिच यशाची गुरूकिल्ली आहे.आत्मविश्वासावर क्रीडा क्षेत्रात विदयार्थ्यांनी घेतलेली गगनभरारी निश्चितच प्रेरणादायी आहे- कोषाध्यक्ष विवेकजी मदन]

